Related Posts Plugin for WordPress, Blogger...

शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

9 ऑक्टोबर 2011

जगण्याचा उत्सव व्हावा : वर्षा उसगांवकर







जगता जगता अपुल्या जगण्याचा उत्सव व्हावा;


म्हणून जळता जळता मी हृदत फुलवले माझे.



-श्रीकृष्ण राऊत




किती नेमकं आणि खमकं सत्व पकडलं शब्दात ह्या कवीनं.अख्खी न्यु जनरेशन अशा गझलांच्या प्रेमात पडणार नाही तर काय!.त्यांची लाइफ स्टाइल... ‘जगण्याचा उत्सव’ जिथे प्रकटेल ती त्यांच्या पिढीची कविता...ती त्यांच्या जनरेशनची गझल.



आल्या आयुष्यात कविता लिहिण्याची उर्मी आली नाही असा माणूसच नाही.आपल्याला सुचलेलं भलेही वहीच्या मागच्या पानावर खरडलं असेल.जगण्याच्या प्राधान्यक्रमात ते कदाचित मागं पडलं असेल.पण ओरखड्यासारखा त्याचा सल मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी असतोच असतो.



बाविशीतली तरुणाई कृष्णाच्या मीरेसारखी गझलदिवाणी झालेली पाहिली... गझल लिहायला शिकण्याविषयी कम्मालीची क्रेझी झालेली पाहिली की घड्याळाचे काटे उलटे फिरतात...मीही बाविशीत जाते..माझं मन तर अगदी सहा वर्षाची चिमुरडी होतं...माझा उजवा हात आपसूक डोक्याच्या वर जातो...डाव्या कानाला धरू पाहतो ... आणि मन म्हणतं,‘पुरला हात माझ्या कानाला!’आता मलाही मिळेल अ‍ॅडमिशन राऊत सरांच्या ‘गझल शाळेत’...



आयुष्याच्या असंख्य वळणावर थोडसं भकासलेपण आतून दाटून आलं असताना आज माझ्या सोबत आहेत श्रीकृष्ण राऊत सरांच्या सुंदर गझला.



आणि जगात फार थोडे भाग्यवंत असे असतात की, त्यांना गुरू लाभतो. माझंही तसंच झालं.आज आपल्या गुरूबद्दल त्यांच्या गझलांबद्दल मला जर मत मांडायचे असेल तर,काय शेअर करायचं आणि काय-काय शेअर करायचं? असा एक साधा आणि सरळ प्रश्न. ऊभा असतांनाच मनात खोल खोल रूतलेलं. गझल वाचून जे आवडलं ते स्वत:भोवतीची कुंपणं तोडून, थोडं स्वत:ला सावरत जाणवलं की,ज्या गझला आज हक्काने आपण वाचतोय त्या पेक्षाही काल त्यांच्या गझलांबद्दलचं,चित्रपट गीत लेखनाच्या काहीतरी खास प्रसंगाचं स्मरण रंजन मला नव्याने होऊ लागलं.



भावनेच्या ओघात वाचन प्रकाराच्या प्रकाशरेषेवर उभे असतांना आज आपण त्यांच्या त्यांनी मोकळ्या मनानं लिहलेल्या शब्दांवर त्यांच्या गझल क्षेत्रातल्या ‘सच्च्या लगन’ वर लिहिण्याच्या कलेवर गझलांच्या दुनियेतून स्वत:ला घडवत तयार केलेल्या अभिव्यक्तींवर बोलायचे, लिहायचे म्हणजे सतत आनंदानं, अपार श्रद्घेनं एकेक गझल वाचत सारा अभ्यासच उरकावा लागेल तेव्हा सरांनी सांगूनच टाकलं की, घाबरू नका अवघड काहीच नाही... सगळं इतकं गमतीशीर आणि सोप्पं आहे की,



तुम्हाला वाटेल ये तो चुटकी बजाके हो सकता है... करून तर पाहू...



तो बजाओ चुटकी... चुटकी वाजते की, धडधड विचार करायला सुरु. याचे जज्ज तुम्हीच...!आणि मी ही सारं'एन्जॉय' केलं.



प्रत्येक विषयाच्या गझला त्या त्या विषयाला स्टेपल केल्या. घरात असतांना एकवेळ, बाहेर जातांना एकवेळ आणि घरी येतांना एकवेळ अशी उजळणीच मी स्वत:ला लावून दिली आणि काय आश्चर्य आयुष्याच्या सकाळी आणि संध्याकाळी शब्दांशी खेळत अगदी बिंधास खेळत शुटींगचा, कार्यक्रमाच्या तारखांचा गुंता सोडवत स्वत:ला, स्वत:तल्या हट्टी वृत्तीला गझल वाचनात बंदिस्त केलं ते अगदी तळापर्यंत... तुम भी डूब जाओ...




चोरून सर्वांपासुनी जो ठेवला फोटो तुझा;


त्यालाच एकांती कधी मी चुंबितो वेड्यापरी.




असं पार वेडं होणार्‍या सोनेरी क्षणांनीच तर साजरा होतो जगण्याचा उत्सव.तर चला सेलिब्रेट करू ... राऊत सरांच्या लाघवी गझलांसोबत.

पोहता येत नसतांना नाकातोंडात पाणी गेल्यावर स्वच्छ जगण्याचा अर्थ लख्खं प्रकाशासारखा पडतो ना अगदी ती ‘स्टेज’ ती अनुभूती मी अनुभवलीय गझलांच्या वाहत्या नागमोडी वळणवाटांच्या अस्थिर नदीवर...! शब्दांचे दुस्तर घाट चढत पायाखालचे ‘ट्रॅक’ न बदलवता...




दरसाल पूर येतो वाहून गाव जाते;


द्याना अशा नदीची वळवून धार आधी.




मुठी आवळत रोजच्या धावपळीतून स्वत:च्या वाचन सवयीला हरघडी सुधारत अधल्या मधल्या कचाट्यातून सुटत मी वाचतच गेले गझला आणि होतचं गेले अंतर्मुख...










समर्पणाची पूर्ण तयारी प्रेम मागते;


मीपण अवघे किंमत भारी प्रेम मागते.




राऊत सरांच्या वेदनेत आणि भावनेत शब्दांच्या कचाट्यात आनंद शोधणार्‍या मनापासून स्वीकारणार्‍या आणि थोडीसी घुसमट जरा जास्तच झाली असतांना शब्दाशब्दांच्या वणव्याची विझलेली राख अंगणभर पसरावी आणि परमात्म्याच्या देव्हार्‍याशी ती राख धुनी बनावी ‘उदी’ बनावी अशीच काहिशी!



गझलांच्या या स्थिर प्रदेशात स्वत:चं अस्तित्व सिद्घ करणारी, हर एक गझल अनुभवांनी रस्ते फुलल्यागतच...



किती वेगळी...किती अद्भुत...किती स्पेशल..एकेक गझल वाचली आणि मनाचा कोपरा न कोपरा जिवंत झाला. धमन्यातून चैतन्याची कारंजी वाहावीत अशा कल्पक, व्यापक आणि उत्कट गझला बेधडक धडकल्या आणि त्याचा दणकट आवाज कानठळी न बसवता अंत:करणात चक्क विसावला.

`सुरमई धुन' बनून...



अशी लाखमोलाची शिकवण मला मिळावी आणि मी मांडावी माझ्या परीने याचाच आनंद मी का जागवू नये मानू नये. असे वारंवार वाटू लागले.वन्स अगेन आय केप दॅट गझल्स प्रॉपर अवे.



या वेळचं गझलबद्दल लिहीणे बोलणे सिनेमात काम करण्यासारखचं होतं माझ्यासाठी! गंधालाही चेतना, संवेदना देणारे शब्द वाचता-वाचता मलाही प्रश्न पडला विचार मोठा की प्रतिमा? फॉर द सम टाईम्स इटस डिफीकल्ट टू...’ गझले समोर काल आव्हाने होती, आजही आहेत. उद्याही असतील.




परीक्षा संपली कोठे अरे अद्याप सीतेची;


मला सांगू नको रामा तुझा वनवास थोडासा.





प्रश्न केवळ तात्विक पद्घतीवर सुटत नसतात. लिखाणाचे, वेदनांचे संदर्भ लक्षात घेऊन नव उभारणीचा निर्धार करावाच लागतो. गझल ही अपघाताने येणारी गोष्ट नाही. ही एक सातत्यपूर्ण अशी चालणारी प्रक्रिया आहे.



स्वत:ला झोकून दिलं तरचं गझलेचा स्तर उंचावतो. त्यातून क्षमतांचा विकास होतो आणि मग स्पर्धा कुणाशी नसतेच असते ती फक्त स्वत:शी स्वत:च्या लिखाणाशी...



मी करून पाहिलं...

तकलादू समाधान की उज्वल भविष्य हा सध्याच्या गझलकारांकडे एक साधा प्रश्न उपस्थित आहे.

पण तरीही

सगळे फक्त राहतात म्हणून आपण का कासावीस व्हायचं? भिरभिरायचं? आपल्या जागेवर जाऊन स्थिर व्हा... शांत व्हा...

मग हातात घ्या राऊत सरांच्या गझला आणि लागा वाचायला.




...मग काय होतं ते बघा. सध्या वाचक गुदमरून गेलाय तसंही साहित्य क्षेत्राला ती झळ कायम दुखावते आहे. सध्याची तरूणाई मस्तीत गुल असतांना त्यांचं जगणं त्यांनाच नकोस असतांना त्यांना राऊत सरांच्या गझला वाचावयास द्याव्यात जगण्याची हिंमत येऊन किंमत काय असते हे कळेल त्यांना... आपण काय केलं आजवर?



सांजवेळी संगतीला एक नाही पाखरू;


तेरवीच्या पंगतीला खूप आली माणसे.




ह्या विचाराने डोकं ठणकेल त्यांचं राऊत सरांची गझल म्हणजे जन्माच्या गाठी त्या ठणकणारचं!

कागदावर शब्दांचा फक्त पसारा म्हणजे गझल नव्हे...



खरचं सोपी नसते ही गझलेची वाट.सगळ्याच गझला फुलतात. बहरतात. जगतात. जगवतात गझलेल्या प्रेमात पडलेल्या माणसांना.



नुस्त्या राऊत सरांच्या गझलांचा वाचनाचा अनुभवचं इतका ‘बेहाल करतो की पुन्हा ‘उभं’ राहणंच काय पण श्वास घेणं मुश्कील व्हावं.



गझल वाचल्याशिवाय...!



(शब्दांकन:अर्पिता जोशी,डॉ.नेहा फुंडकर)

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

संपादक : डॉ.श्रीकृष्ण राऊत

संपादक : डॉ.श्रीकृष्ण राऊत
gazalkar@gmail.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP