Related Posts Plugin for WordPress, Blogger...

शुभेच्छा : दिवाळी २०११

शुभेच्छा : दिवाळी २०११

तमा नाही अंधाराची
एक पणती लावूदे;
फार वाटते एकटे
हात हातात राहूदे.

इवल्याशा पणतीने
दूर पळतो अंधार;
लढणा-या माणसाला
देते शुभेच्छा आधार.

9 ऑक्टोबर 2011

...ज्यांची उद्या भरारी छेदेल अंबराला : शोभा डे




‘गझल’ हा विषयच साहित्य प्रांतात अगदीच नाजूक फार नाजूक त्या विषयी आक्रस्ताळा युक्तीवाद युक्तिवाद करण्यापेक्षा ‘बी सायलेंट!’



सारवा सारव करण्यापेक्षा गप्प बसण्याची ताकद कधीही मोठीच! ना विषयाचा संदर्भ ना व्याकरणाचा शिडकावा आजवर जे लिहिले ते अनुभवातून.या प्रवासातून जे सूचलं त्यांची किताबे झाली. लोकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. पण एक रुखरुख एक सल मनात कायमची होती म्हणजे ‘टू राईट अ गझल नीड अ ब्रेन ’ अशी गझल लिहायला डोकं लागतं वाचन लागतं तरीही तो मोह टाळणं तो टाळता येणं इम्पॉसीबल! माझ्यातल्या या अवघड मौनाचा गुंता गेली अनेक वर्षे माझ्या औत्सुक्याचा आणि अभ्यासाचा विषय तरीही या विषयाने मला पार पछाडलेलचं.



या बद्दल चुरचुरीत आणि दिखाऊ,बोलण्यापेक्षा हा विषय ‘आऊट ऑफ’ केला असतांनाच एका दुपारी जेवणाच्या टेबलावर निवांत ताजेतवाने होत आम्ही आरामात बसलो होतो. बोलता-बोलता चेहर्‍यावरचे भाव पटकन ठाकठीक करत थोडसं वाकबगार होत...


अतीव वाचनाच्या उत्साहाने, ओथंबलेल्या नजरेने शुभ्र रुपेरी कागदांच्या बिर्‍हाडातून.



श्रीकृष्ण राऊत ह्यांच्या गझला वाचायला घेतल्या आणि जागतिक प्रसिद्घीच्या वलयाबरोबरच यशस्वी लेखकांच्या यादीमध्ये असणारं माझं नाव मी स्वत:भोवती शोधू लागले.प्रोफेशनने प्रोफेसर असलेल्या आणि संशोधनाने डॉक्टरेट मिळविलेल्या श्रीकृष्ण राऊत ह्यांना सर म्हणायला मला आवडेल.


राऊत सरांच्या गझलांबद्दल या वेळी काही लिहणं म्हणजे जोखीमच.



‘दो वी ट्राय टू होल्ड एव्हरी मोमेंट इन हॅन्ड, इज ईट पॉसीबल?



आडवाटा आणि वळणवाटा तुडवत स्वत:चे रांगडे अनुभव शब्दबद्घ करणे तसे साहाजिकच !पण काफिया,रदीफ. मात्रा, लघु, गुरूंच्या आवरणाभोवती फिरणारी गझल जणू कोसोमैल आवाक्यात नसणारी...

पण एकेक गझल हाती घेतली आणि त्यातील सुख दु:खाचे वाटे घेता घेता ‘देणारा’ हात खुला ठेवण्याची कसरत करत मी स्वत:च दाद देऊ लागली. स्वत:ला, स्वत:च्या मनाला तावून सुलाखून लिहिण्याची अखंड सवय असणार्‍या माझ्या लेखिका ह्या अस्तित्वाचे पाश गळून पडल्यासारखे झाले. आणि काय आश्चर्य! माझ्यातीलच वाचक टक्क जागा झाला. कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गझला वाचत अखंड दगदग. राहून गेलेल्या एखाद्या शेराची टोचणी... अस्वस्थता... ह्या चक्रात फिरता फिरता स्वत:चा संवाद थांबला आणि मी एक प्रामाणिक वाचक म्हणून सहभागी केले स्वत:ला... मनाला कुरतडणार्‍या, दु:खाला पोखरणार्‍या कोरड्या आणि निरर्थक कवितांच्या जोखडातून गझलेतला प्राणवायू मी शोधू शकले ते राऊत सरांच्या टोकदार शैलीतल्या, मनाची गाठ उकलणार्‍या, जगण्याची एक विशिष्ट पद्घत आखून देणार्‍या गझलेतच...



‘दे हॅव टू वॅनीश? देन ओन्ली रिमाईन सम रेन्स सम शायनी कलर्स ऑफ वॅरीयस फ्लॉवर्स सम लाईटनिंग्स ऍन्ड डिव्हाईन सोल्स’



संस्कृती, रीतीभाती, स्वभाव आणि सवयीच्या जगण्याची उलथापालथ करत ‘सीने में जिस रफ्तार से गोली उतरती है उस रफ्तार से गझल!’



अडथळे, विरोध आणि संघर्षाचा सामना करीत पुढे जाण्याचा ललाटरेख प्रत्येक गझलेच्या नशिबी रोज उमटवून नवीन धडा गिरवत नव्या गोष्टी गझलेला शिकवत ‘परफेक्शन’ चा ध्यास घेणारे राऊत सर त्यांच्यात एका गझलेच्या शेरात म्हणतात-




‘वारूळ शोधणार्‍या मुंग्या पुढे निघाल्या;



वाटेत पर्वतांनी केली जरी मनाई.’



कुणाच्याही आशीर्वादाची थाप आणि कौतुकाचे भुकेले नसलेले राऊत सर मी यावेळी अनुभवलेतच त्यांच्या शाब्दिक चकमकीतून...आणि क्षणभर जाणवलं की, गझल वाचतांना जशी डोळयाला सवय लागावी तसेच मनालाही! नजरेतलं कुतूहल जागं झालं आणि मनातला आनंदाचा झरा अखंड ओला राहिला. एकेक अक्षर जोडत गझल लिहणार्‍यांच्या जगात वेदना-भावना सार्‍या लुळ्या होतात पण सरांनी ज्या ताकदिनं, जिंदादिलीनं काहीतरी भन्नाट स्वप्नं घेऊन आनंदाने आपली वाट चालत ज्या गझला लिहिल्या त्या त्यांनी नुस्त्या लिहिल्याच नाहीत तर चक्क जगलेत...


‘देन ओन्ली वी रिलाईज ब्यूटी ऑफ दॅट मॉमेन्टस.’



आपल्या भात्यात हवेत काही समीकरणाचे बाण... जे हमखास एकमेकांच्या साथीने वापरले की, लक्ष्यभेद अचुक होतेच.हे सांगणारी गझल शब्दाशब्दांतून उलगडते तेव्हा जन्मदात्री होतांना वेदनेच्या वाटेवरून जावे लागते तिचे सोसणे जसे शब्दांच्या परिघात मावत नाही तसेच आहे सरांच्या गझलांच्या दुनियेत.



हजारो शहर पालथी घालीtatत, लाखो कादंबर्‍या वाचण्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर वाचा फक्त सरांची एक गझल... गझल हा शब्द अजूनही साहित्य परंपरेत ‘महाकठीण’ असला तरी त्याच्या अर्थाचे चटके मात्र वाढत्या संख्येने बसू लागले आहेत निकोप गझल लिहीणार्‍यांनी, हे वास्तव कसं नजरेआड करता येईल? ‘वीच वी लॉस्ट इन द पास्ट’ बदलत्या साहित्य क्षेत्रात बदलती जीवनशैली जोपासायची असेल तर गझल रूजवण्यासाठी प्रयत्न करावेच लागतील.



-आणि त्या प्रयत्नांना सामोरे जाण्यासाठी दमदार लिखाण स्वीकारण्याची कणव आधी रक्तात भिनवावी लागेल.



काही वर्षापूर्वी ज्या चक्रातून माझं स्वत:चं आयुष्य गेलं, त्या खेळाचे नियम मी वेगाने बदलतांना पाहाते आहे. अश्वत्थामाच्या मस्तकावर चिघळलेली जखम असावी तशी गझलेची ठणक सोसतांना आजच्या लेखकांना त्यापेक्षा कविताच परवडतात.












म्हणूनच जीवाला जीव देत लिहिण्या-वाचण्याच्या चैतन्यदायी प्रक्रियेला, जुन्या काचांना आणि प्रश्नांना नवी उत्तरे शोधण्याचे प्रयत्न अखंड चालू ठेवायचे असतील तर गझलेला जगण्यात समाविष्ट करावे लागेल. ज्ञानाधारीत समाजरचनेत गझल हा खरं तर बुद्धिप्रामाण्यतेचा विषय तो सामान्य बुद्घीच्या माणसाला पचनी न पडणारा विषय.



कपाळावर आठ्यांचं जाळं... आक्रसलेल्या भुवया... ताणलेली विरूद्घ नजर... धुसफुसत जगणार्‍याला जीवंत करायचे असेल तर ‘गझलांचा डोज’ द्यावाच लागेल. नुस्ती वाहवाची दाद नको.



परस्परांच्या सहवासातून, अनुभवांतून, सोयी सवयीने जुळवून नमवून घेत घेतचं गझलकाराने साध्या मुक्तछंदातील एखादी भरीव चारोळी लिहली तरी आपल्याला ते नकोसं असतं.



आपल्याला हवा असतोच असतो एखादा ‘एनर्जेटीक’ शेर...




ज्यांची उद्या भरारी छेदेल अंबराला



संचारली हवा ती ह्या पाखरात माझ्या.




ते’ आणि ‘आपण’ अशी थेट फाळणी करतच स्वच्छ गझल निर्मितीचे यशस्वी आव्हान पेलणारे राऊत सर काया-वाचा-मने गझलेशी कसे एकरूप आहेत हे त्यांच्या वाचाळ प्रेमाच्या रतीबाचा खुलेआम तमाशा न करता ‘वर्ड कोल्ड वॉर’ आणि ‘हॉट खुन्नस’ मी अनुभवलीय प्रत्येक पानावरील प्रत्येक शब्द शब्दांत... कितीही जीवाचा आटापिटा करत लिहायची ठरवली तरी लिहू शकतो आपण गझल?

ती कागदावरच विरते आणि मागे पाहावे तर कागदांच्या रेषांवरचं आपलं हसू होतं. हे का व्हावं?

असा सहजचं एक सवाल माझ्या मनात कायमचा विसावला.


पण राऊत सरांच्या गझलेतली सशक्त धमक त्यांच्या शब्दांचा वचक इतका जाणवला की, वरवर त्याचं सरळ दिसत असलं तरी त्यातला अर्थ इतका अगाध होता की,

शब्दांवर एकाधिकार चालविण्याच्या आणि मालकी गाजवण्याच्या माझ्यातील मुजोर प्रवृत्तीला क्षणार्धात धुळधाण लाभलं.



‘बट ऑल धिस वॉज सो प्रेसीअस फॉर मी व्हेन आय कम्पेअर्ड दोज व्हू समथींग लाईक.आय क‘आन से इन ओन्ली वन सेन्टेंन्स ‘‘आय रिड राऊत सर गझल्स ’’ मला जे येतं तेच विसरण्याची गरज आहे असे माझ्यातील परफेक्शनिष्ट लेखिकेला जाणवलं.



उत्तम वाचनाचा मनमुराद डंख आपल्या आवडीनिवडीवर मारला की, ‘इगो’ नावाचा विंचू वाचनाच्या आलीशान भिंतीमधून ठेचला गेलाच पाहिजे तो म्हणजे कायमचाच! गझल संवादाच्या माध्यमातून साहित्यक्षेत्राची परखड चिकित्सा आणि करायची आहे लिखाणात पडत चालेलं अंतर आणि गझलेचं अवस्थांतर याचा शोध घेण्याचा राऊत सरांच्या गझलांच्या निमित्ताने हा एक उमदा प्रयोग आहे.



त्यांच्या गझलांना भावनिक चौकटीतून बघितलं तर सभोवतलालच्या रक्तरंजीत तडफडींचा पुळका यावा एवढे भयानक वर्णन काळजावर घाव करून जातात.



आलिशान सेटस पांढरे शुभ्र कागद रंगीत विषय आणि चमचमीत शब्द अशी असते का गझल?



खानदानी गझल मुरायला खानदानी कसब लागतं. ही खानदान म्हणजे जन्मजात नाही तर अनुभवाच्या खाच खळग्यातून जाणीवांनी प्रगल्भ होणारी दणकट सरहद्दच!



राऊत सरांच्या गझलेत सौंदर्य, वेदना म्हणजे खुबसुरती आणि दर्द हा गझलेचा गाभा ! म्हणूनच त्यांनी गझलेची प्रत्येक वाट जोखली...



... आणि बंदिशीतील शब्दांचा आविष्कार करण्याचे स्वातंत्र्यही जपले.




तुझी वाट नाही जगावेगळी रे


पहा सर्व वाटा मिळाल्या स्मशानी.



गझल संस्कारावर अवतरलेल्या प्रतिभेला घट्ट धाग्याची वीण द्यायची असेल तर नव्या पिढीला द्याव्या लागतीलच या मस्त कलंदर व्यक्तीच्या जिवापाड अंत:करणातून शब्दबद्घ केलेल्या ‘मोरल’ गझला...त्यांनी लिहिलेल्या गझलांमधील शब्दांशी साधलेला संवाद. प्रकर्षाने व ठळकपणे येताच शब्दांना त्यांनी केवळ न्यायच दिला नाही तर, त्यातील उच्चारण सौंदर्यांना आनंद कसा सर्वसामान्याला पण घेता येईल...गझल,राग रचनेच्या सुरांवटी मधून शब्दमाधुर्य शोधण्याचा त्यांच्या प्रतिभावंत निरिक्षणाचा मनोहारी संगम साचेबद्घ केला.



-साहित्य, संस्कृती, परंपरा, त्याग वगैरे सारख्या संशयास्पद मूल्यांचे टेकू लावून उभारलेली गझल सरांनी आयुष्यातही येऊ दिली नाही. त्यांच्या लेखनशैलीत मूळातूनच सारं झुगारून द्यायला निघालेली गझल पुढे पुढे वाचतच राहण्याची मनातून अशी ओढ वाढतच गेली...



नाहीतरी आपण दुसरे काय करतो? सारीपाट खेळावा तशा सोंगट्या मांडून बसतो आपल्या विचारांच्या, अनुभवांच्या चौकटीभोवती...



आपणचं विणलेल्या उलट सुलट धाग्यांच्या जाळ्यात असे अडकतो की, त्यापुढे दमछाकच होते.



थंड डोक्याने शांतपणे विचार करावा आणि गझल लिखाणाची चिकित्सा करावी तर पुन्हा नवे मुद्दे, नवी खाडाखोड आणि नवे गोंधळ वरवर साधीसोपी दिसणारी गझल लिहिता लिहिता कसा घाम फुटतो हे मान्य करायलाच हवं...



गझलांच्या वाटेने जात अफलातून शब्दात मस्ती भरणारे राऊत सर त्यांच्या गझलांमधून जे ‘शेअर’ करत गेले त्यात अंधश्रद्घा, यातना असल्या कचाट्यात सापडलेल्या स्त्रीची वैतागवाडी’घरात राब राब राबणार्‍या स्त्रीची कणव, वेदना मांडण्यासही कवी चाचरले नाहीत. उलट प्रत्येक गझल आणि प्रत्येक मतला

प्रत्येक शेर त्यांनी मोठ्या अदबीने पेश केला.





सौभाग्य रेखणारे कुंकूच भासले जे;


कोण्या तरी मढ्याचा तो ही गुलाल होता.



मुक्या वेदनांना कवटाळून स्वत:च्या जगण्याचा तोल सावरता सावरता चरख्यात उसासारखी पिळून निघणारी स्त्री आणि तिच्या वेदना हा तर वडिलोर्जित चालत येणारा विषय मांडणारी सरांची गझल भावनिक स्तरावर आणीबाणी घोषित करते आपल्या शाब्दिक वर्चस्वाने कागदाच्या अदबी दुनियेत स्वतंत्रपणे आपल्याच मनमर्जीने जिद्दीने प्रवास करते... तुमच्या-माझ्या जगण्यासोबत...निरंतर...



(शब्दांकन : प्रा.पुरू तायडे पाटील)

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

संपादक : डॉ.श्रीकृष्ण राऊत

संपादक : डॉ.श्रीकृष्ण राऊत
gazalkar@gmail.com

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP