हा सूर बासरीचा वाजे कुठेतरी;
राधाच ऐनवेळी लाजे कुठे तरी.
मी सोसल्या मुक्याने सा-याच यातना;
पण रक्त सांडले हे ताजे कुठेतरी.
माझ्या तुझ्यात नव्हती कसलीच बंधने;
पण वाद केवढा तो गाजे कुठेतरी.
झाला करार जेव्हा हा देश राखण्या;
हरलेत बादशाही राजे कुठेतरी.
पदरात झाकुनीया हा देह नवनवा;
ती माय लेकराला पाजे कुठेतरी.
मो.९३७३९३१८५१
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा