८ ऑक्टोबर, २००८

इशारे : अभिषेक उदावंत

होते तुझे इशारे;
गुंतून ठेवणारे.

मी बोलतो तुझ्याशी;
जळतात मित्र सारे.

बाजार हा ठगांचा;
विकतात चंद्र तारे.

खाऊन मांस घ्या मग
गोमुत्र शिंपडारे!

जिंकायच्या दिशा तर
पायात बांध वारे.

बिनधास्त मात्र कैदी;
धाकात हे पहारे.

मो. ९९२२६४६०४४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: