१३ मार्च, २००९

१. आळंदी



जरी ओठांवरी येती नभाचे शब्द स्वच्छंदी
मला बोलायची बंदी, तुला ऐकायची बंदी

उपाशी लोकहो आली दिवाळी राजपुत्रांची
दिवे जाळून रक्ताचे करा अंधार आनंदी

कसा घ्यावा तुझयापाशी विसावा श्रांत चंद्राने?
तुझ्या डोळयात स्वप्नांचा उभा वाडा चिरेबंदी

चला गाऊ सुगंधाची पुन्हा बेकायदा गाणी
फुलांना टाळते आहे वसंताची रजामंदी

दिवाळे काढुनी हा मी कधीचा मोकळा झालो
तुला भंडावते आहे तुझी तेजी, तुझी मंदी

इथे मागून ही माझी समाधी बांधली गेली
जिथे मी गाडला गेलो अरे ही तीच आळंदी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: