निसर्गातील सौदर्य कवी मनाला नेहमीच आकर्षित करीत असत. अगदी पूर्वापार कवितेचा इतिहास पाहिला तर जगाच्य पाठीवर जितके भूप्रदेश आहेत व त्यातील बोलल्या जनार्र्यां प्रत्येक साहित्यात निसर्ग सौदर्य कवितेत अंतरभूत केलेले आढळते . त्यामध्ये साधारणता पाउस ,वारा ,हवा ,फुल ,गंध आकाश ,तारे, चांदण्या,सूर्य ,आणि चंद्र हे निसर्ग घटक वारंवार आलेले आढळतात . त्यामध्ये चंद्र हा सर्वात लाडका आणि कवितेत सहज आढळणारा एक विषय आहे . अगदी पाश्चिमात्य कवी पासून ते आपल्या इथल्या कवी पर्यत चंद्राला कवितेत मांडण्याचा मोह सगळ्यांच दिसून येतो . ह्यावरून आपल्यला असे कळते की चंद्र हा काव्यात खूप कविप्रीय आहे .
पण चंद्र हा नुस्ता कवितेतच प्रिय आहे असे नाही तर काव्यातल इतर प्रकारातही तितकाच आवडता आहे .त्यामध्ये विशेष करून गजल आणि उर्दू शेरोशायरीत चंद्राला वेगवेगळ्या स्वरूपातून आणि प्रतीकातून मांडून उर्दू शायरीचे विविध पैलू प्रगल्भ केलेले दिसून येतात . तसे पाहिले तर उर्दू शेरोशायरीत आणि गजलेत नजाकत सौंदर्य आणि भाव -भावनांची गुंफण इत्यादी गोष्टींना खूप महत्व आहे . त्यामुळे चंद्राचे रूप मग ते अर्धकोर असो की पौर्णिमेचा पूर्ण उगवलेला चंद्र त्याला उर्दू शायरीत त्याला तेवढेच महत्व आहे . शाहेरणे चंद्रच रूप हे त्यांच्या शेरात वेगवेगळ्या पद्धतीने आणि विविध प्रतिकात्मक स्वरूपातू मांडून त्या द्वारे वेगवेगळा विचार प्रवाह आणि कोठे कोठे गहन तत्वज्ञान ही मांडलेले दिसून येते . चंद्राच्या रूपाच वैशिष्ठ सांगायचे झाल्यस त्याचा शितल मंद प्रकाश , सुवर्णकांती उजळपाना आणि पूर्ण आकार उमललेल तेजस्वी स्वरूप हे सर्व कवी आणि शायरांना आकर्षित करीत असत म्हणूनच एक शायर त्याच्या शेरात म्हणतो-
फुल है चांद है क्या लगता है
भीड में सबसे जुदा लगता है
उर्दू शायरीत बरेचदा शायर प्रेयसीच्या मुखाची तुलना चंद्राशी करतो आणि चंद्राच्या तेजस्वी सुंदर लखलखत्या मुद्रेला त्याच्या प्रेयशीच्या मुखाची उपमा देवून तिला अनोख्या अंदाजात संबोधून म्हणतो -
आपको ईद का चांद मुबारक हो
आपने चॉंद नही आईना देखा होगा
उर्दू शायरीत चंद्र हा प्रेयसीच्या सौदर्याचे प्रतीकच नसून तो कधी कधी प्रियकराच्या विरह व दुःखाचा भागीदारही झालेला दिसून येतो प्रेयसीच्या विरहाच्या दुखात चंद्राच्या दर्शनाने त्याच्या दुःखाच्या तीव्रतेत अधिकच भर पडली आहे असे त्याला वाटते म्हणून तो म्हणतो कि
चॉंद के साथ कई दर्द पुराने निकले
जितने गम थे तेरे गमके बहाने निकले
रेखाचित्र : प्रकाश बाल जोशी
उर्दू शायरीतील प्रेम हे पवित्र प्रेम आहे . आत्म्याचे जसे परमात्म्याशी ,भक्ताचे जसे ईश्वराशी तसेच प्रेयकाराचे प्रेयसीशी असल्याचे आढळून येते .
जसे भक्ताला देवाच्या भक्तीत काही व्यत्यय किवा अडथळा आलेला आवडत नाही . तशेच प्रियकरालाही तिच्या आठवणीत कोणताच व्यत्यय आवडत नाही म्हणूनच एक शायर त्याच्या शेरात असे म्हणतो -
रात तरोको नुमाईश में खलल पडता है
चॉंद पागल है जो अंधेरे मे निकल पडता है
उसकी याद आई है सासो जरा आहिस्ता चलो
धड्कनोसे भी इबादत मे खलल पडता है
उर्दू शायरीत प्रेयसीचा दीदार म्हणजे तिचे दर्शन होणे महत्त्वाची बाब आहे तिच्या दर्शनाने प्रियकराच्या जीवनातील विरह ,एकटेपणा दूर होऊन जगण्याला रोज नवा आनंद आणि उत्साह मिळतो. तिच्या दर्शनामुळे त्याच्या शायरीला नवीन प्रेरणा मिळते म्हणून तो तिला संबोधून म्हणतो -
मेरा चॉंद सा मिसरा अकेला है कागज पे
तुम छत पे आजाओ मेरा शेर मुकम्मल कर दो
उर्दू शायरीत बरेचदा प्रियकर हा प्रेयसीला सोडून काही कामाकरिता किवा उदरनिर्वाहासाठी दूरदेशी जातो पण तिच्या आठवणीत तो नेहमीच असतो . त्या विरहाच्या रात्री त्याला पौर्णिमेच्या चंद्राच दर्शनही रम्य वाटत नाही. तो चंद्राला पाहून म्हणतो-
हम तो ही परदेस मे , देस मे निकला होगा चॉंद
अपनी रात के छत पे कितना तनहा होगा चॉंद
उर्दू शायारीतला प्रियकर हा चंद्राच्या डागाची तुलनाही त्याच्या प्रेयसीच्या चेहऱ्यासी करतो आणि तिला संबोधून असे म्हणतो-
काश तुम्हारे चेहरेपे चेचक के दाग होते
चॉंद तो तू हो ही सीतारेभी साथ होते
उर्दू शायरीत सुंदर नाजूक कल्पनेला फार महत्त्व आहे . कारण काहीतरी सुंदर पाहिल्याशिवाय सुंदर कल्पना शायर करू शकत नाही . मग तो चंद्र असो वा त्याच्या प्रेयसीचा चेहरा त्याला हे दिसलेकीच तो गजल म्हणतो-
हुस्न को चॉंद जवानी को कवल केहते है
उनकी सुरत नजर आये तो गजल केहते है
उर्दू शायरीत आता पर्यत आपण प्रेम विरह आणि प्रेयसीच्या सौदर्याची स्तुती करण्या करिता चंद्राचा प्रतिकात्मक उपयोग शेरात पाहिला पण उर्दू काव्यात चंद्राला घेऊन विविध अंगानी चंद्रच अस्तित्व शेरोशायरीतून सादर केलेले दिसून येते . खुपदा उर्दू शायरीत चंद्राला प्रतीक घेऊन मोठ तत्वज्ञान मांडताना उर्दू शायर दिसतो .मनुष्य हा विज्ञान आणि तंत्रज्ञान यावरून चंद्रावर पोहचला व तिथल्या मातीचे परीक्षण करतोय पण सध्या पृथ्वीवरच बरच काही अजूनही शोधयाच राहिले आहे . भूतलावर अजून बऱ्याच थोर पुरुषांचा शोध घ्यायचा राहिला आहे . तो आधी पूर्ण करा नंतर चंद्रची माती हाती घ्या ! असे मत एक शायर आपल्या शेरात व्यक्त करतो तो म्हणतो-
जाचकर चॉंद की मिट्टी को भला क्या हासिल
तुने अभी जमी के तारोको देखा ही कहा
उर्दू शायरीत दोन ओळीच्या शेरातून गहन तत्त्वज्ञान सांगितलं जातं . बरेच लोक आपल्या प्रारब्धाला दोष देत आपलं कर्तृत्व आणि मेहनत व चिकाटीच्या वृत्तीला चालना न देता आपल्या अपयशाला फक्त नशीबच जबाबदार आहे असं ठरवून टाकतात आणि देवा जवळ फक्त प्रार्थना करतात. पण भक्तीला कर्तृत्त्वाची जोड देवून ते लक्ष्य साध्य करण्याकरिता यथा योग्य प्रयत्न करीत नाहीत फक्त प्रार्थनाच करतात म्हणून अशा मनोवृत्तीला एक शायर म्हणतो-
तुम अगर रौशनी चाहो तो ताखालिक करो कोई चराग
यु दुआये मांगने से चांद नही उतरनेवाला
मोठ्याचा आदर करून त्यांना योग्य मान दिला पाहिजे अशी समाजाची परंपराच आहे . ही परंपराच नसून ते एक चांगल नैतिक कार्य आहे . म्हणून थोरामोठ्यांचा वार्तालाप सुरु असताना त्यात लहानांनी त्यात मध्ये बोलू नये . हा एक सुविचार उर्दू शायर समर्पक पद्धतीने मांडतो-
बंद रखते है जुबॉं लब नही खोला करते
चॉंद के आगे तारे नही बोला करते
उर्दू शायरीत चंद्राचं अस्तित्व हे खूप वेगळं आहे . चंद्र हा जसा मोठ्यांच्या मनाला लोभस आणि सुंदर वाटतो तसाच तो लहान्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरतो . म्हणूनच बरेच लोक लहान मुलाला चंद्र हा चांदोमामा आहे असे सांगतात आणि घरातील ज्येष्ठ मंडळी लहान मुलांना चंद्राची कथात्मक माहिती सांगतात पण पुढे तीच मुले लहानाची मोठी झाल्यावर चंद्राबद्दलच्या त्यांच्या निरागस कल्पनेत कसा बदल होतो पहा-
मै बाहर क्या निकल आया बचपन के घरौंदो से
वो बुढिया मर गई जो चॉंद पे चरखा चलाती थी
प्रेम आणि तत्वज्ञान हे उर्दू शायरीत दोन मोठे पैलू आहेत पण साकी आणि जाम आणि मैखाना ह्या शिवाय उर्दू शायरी पूर्ण होत नाही त्या मध्येही चंद्र असा येतो-
चॉंद टूटा हुआ टुकडा मेरे जाम का है
ये मेरा कौल नही हजरते खैयाम का है
चंद्र हा पृथ्वीपासून खूप अंतरावर आहे . पण कधी कधी तो पूर्णाकार स्वरुपात रात्री दिसलाकी आपल्यला तो अगदी हातभार अंतरावर असल्याचा भास होतो जणुकाही आपण त्याला आपल्या हातात पकडू शकतो . असे आपल्याला वाटते पण अस्तिवात तसे मुळीच नसते . हीच वास्तविता एक शायर समर्पक पणे जीवनाच्या व्यावहारिकतेला जोडतो तो म्हणतो कि काही लोक आपल्याला जवळचे वाटत असले तरी ते आपल्या कधीच जवळचे नसतात . काहीतरी वैयक्तिक स्वार्था साठी आपल्या जवळ असतात मात्र संकटाच्या वेळी त्यांचे आपल्यातील अस्तिव एक केवळ भास आहे . असे ते आपल्या लक्ष्यात आणून देतात आणि म्हणूनच तो शायर असे म्हणतो-
फासला नजरो का धोका भी तो हो सकता है
चॉंद जब निकले तो हाथ बढाकर देखो
तर अशा विविध आशयाने उर्दू शायरीत चंद्राला वेगवेगळी भूमिका बजावावी लागते आणि उर्दू शायरीत त्याचा बऱ्याच अंगानी समर्पक आणि यथायोग्य उपयोग केलेला आपल्याला दिसून येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा