अनंत भीमनवार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अनंत भीमनवार लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३१ जानेवारी, २००९

घरटे



कोणीतरी मनाशी घरटे करून गेले;
आकाश तारकांचे मज पांघरून गेले.

सांजावल्या मनाचे एकाक चालताना;
निबिडात काळजाच्या मन बावरून गेले.

झाली कशी कळेना रक्ताळ पावले ही;
वाटेत कोण माझ्या सल अंथरून गेले.

आले थव्याथव्याने पक्षी तुझ्या सयींचे; 
राखेवरी फुलांचे कशिदे भरून गेले.

केसातल्या जुईचा स्वप्नात भास झाला;
गंधाळल्या पहाटे मन मंतरून गेले.

मागू नकोस आता जपले जिवापरी मी; 
माझ्या कुशीमध्ये जे क्षण मोहरून गेले.

नाही कसे म्हणू मी कुंकूच भाग्यशाली;
सरणापुढून अंती मज सावरून गेले.

-अनंत भीमनवार