सुदर्शन फ़ाकिर
ये दौलत भी ले लो ये शोहरत भी ले लो
भले छीन लो मुझसे मेरी जवानी ।
मगर मुझको लौटा दो वो बचपन का सावन
वो काग़ज़ की कश्ती वो बारिश का पानी ।
कड़ी धूप में अपने घर से निकलना
वो चिड़िया, वो बुलबुल, वो तितली पकड़ना,
वो गुड़िया की शादी पे लड़ना-झगड़ना,
वो झूलों से गिरना, वो गिर के सँभलना,
वो पीतल के छल्लों के प्यारे-से तोहफ़े,
वो टूटी हुई चूड़ियों की निशानी।
जगजितसिंग यांच्या रेशमी स्वरात हे गीत आपण खुपदा ऐकले. ‘रम्य ते बालपण’ आठवत कितीतरी वेळा गुणगुणले.अशी गाणी सकाळी सकाळी हलक्याशा लिपस्टिकसारखी एकदा ओठावर चढली की दिवसभर ओठांवर असतात.सूर्य मावळला तरी ती मावळायला तयार होत नाहीत.
एखाद्या कलाकृतीचं नशीब असं असतं की ती कलावंताच्या नावाहून जास्त मशहूर होते.वरील गीताचंही तसंच झालं. कवीच्या नावाहून जास्त रसिकप्रियता गीताच्या पदरात पडली. आणि मग एक दिवस कवीचं नाव अचानक पुढं आलं ते थेट बातमीत-
‘कागज की कश्ती लिखनेवाले शायर सुदर्शन फा़किर नही रहे।’
ती तारीख होती : १९ फेब्रुवारी, २००८

हम तो समझे थे कि बरसात में बरसेगी शराब
आई बरसात तो बरसात ने दिल तोड़ दिया
दिल तो रोता रहे, और आंख से आंसू ना बहे
इश्क़ की ऐसी रवायात ने दिल तोड़ दिया
एकेकाळी मलिका-ए-गझल बेग़म अख्तर यांचा लाडका असलेला
हा शायर नंतर जगजित-चित्रा यांचाही ‘जिगर का तुकडा’ झाला.
हिन्दी सिनेमाच्या मायावी जगात आला.एक- दोन सिनेमात गीत लिहिली.मुंबईच्या चमकधमकमधे तो काही फिट होऊ शकला नाही.राज्यशास्त्रात एम.ए.होणं वेगळं आणि कलेच्या राजकारणात पारंगत असणं आगळं.हे त्यांना कळलं असेल पण खूप उशिरा.सगळ्यांना थोडीचं जमते सेल्समनशिप.
ते जाऊ द्या, पण कुठल्याही व्यावहारिक आणि लौकिक यशाहून सुदर्शन फा़किर यांच्या गझला लाखपट मोठ्या आहेत.वाणगीदाखल काही ओळी पहा-
ज़िन्दगी को क़रीब से देखो
इसका चेहरा तुम्हें रुला देगा
ग़म बढे़ आते हैं क़ातिल की निगाहों की तरह
तुम छिपा लो मुझे, ऐ दोस्त, गुनाहों की तरह
जब हक़ीक़त है के हर ज़र्रे में तू रहता है
फिर ज़मीं पर कहीं मस्जिद कहीं मंदिर क्यूँ है
लिखा हुआ था जिस किताब में, कि इश्क़ तो हराम है
हुई वही किताब ग़ुम, बड़ी हसीन रात थी
साध्या साध्या शब्दात फा़किर साहेबांनी जी जीवनसत्ये मांडली त्याला तोड नाही.
नाती दोन प्रकारची असतात;एक रक्ताचं, दुसरं शाईचं. अशा शायरांशी
आपलं शाईचं नातं असतं.म्हणून तर त्यांची बातमी वाचून आपण आतल्या आत तुटतो.
आजकाल तसं प्रत्येक नातं कमर्शियल झालं.रिलेशन मेंटेन करणं आलं.हरेकगोष्टीत व्यवहार आला.मार्केटिंग आलं.लेन-देन आली.ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना मानवतातच असं नाही.मग अशी अनफिट माणसं तथाकथित मेनस्ट्रिम मधून अलगद बाहेर फेकली जातात.त्यांना त्याची खंतही नसते. ते आपल्याच मस्तीत आयुष्यभर जगतात आणि एकदिवस फा़किर साहेबांसारखा गुमनामसा अलविदा घेतात.समझौत्यांच्या व्यवहारी गर्दीला दूर सारलं तर एखाद्या सच्च्या कलावंताशी आपली भेट होऊ शकते-तो गेल्यावर- त्याच्या शायरी मधे-
चलती राहों में यूँ ही आँख लगी है 'फ़ाकिर'
भीड़ लोगों की हटा दो कि मैं ज़िंदा हूँ अभी
सुदर्शन फा़किर यांच्या गझला-कविता येथे वाचता येतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा