८ ऑक्टोबर, २००८

गावबंदी : मनोज सोनोने

चिंता करू नको तू म्हणतात लोक सारे;
चिंतेत तेच मोठ्या दिसतात लोक सारे.

तो-यात कोणत्या रे जगतोस माणसा तू;
तो-यात जन्म जातो फसतात लोक सारे.

गांधी तुम्हीच सांगा मिळतात शस्त्र कोठे?
हिंसाच सत्य आहे, बकतात लोक सारे.

बांधू नवीन वस्त्या पाडून झोपड्यांना;
या फक्त घोषणेवर जगतात लोक सारे.

आधार मागण्याला येता फकीर कोणी;
त्यालाच गावबंदी करतात लोक सारे.

मो.९९२१५४३२३१

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: