८ ऑक्टोबर, २००८

गझल : अमोल शिरसाट



चेह-यावर भाव खोटा;
नाटकांना काय तोटा ?

लागतो ठसका जरीही;
घास घ्या तोंडात मोठा.

घ्या चवीला मीठ थोडे;
खात जा नुसत्याच नोटा.

फक्त ‘माझे’ ऐक थोडे;
खूप तू होशील मोठा!

रोज घ्या बाराखडी अन्
अक्षरे तितकीच घोटा!


मो.९०४९०११२३४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: