४ फेब्रुवारी, २००९

माणसात मी



एवढेच शिकलो जीवनात मी;
रोज रोज फिरतो माणसात मी.

भेट कृष्णा मला एकदा तरी;
अडकलो बघ इथे कौरवात मी.

वाचल्या पुस्तकी लाख मी कथा;
पाहिले ना तसे प्रत्यक्षात मी.

उंच उंच उडण्या जीव हा जळे;
वेढलो पण कसा कासवात मी?

तारकांचे किती स्वप्न पाहिले;
पाहिली ना कधी चांदरात मी.

भेट वा टाळ मज सावकाश तू;
मानले तुज कधी दैवजात मी.


 -श्रीराम गिरी 
मो. ९७६३००४४९४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: