१ सप्टेंबर, २००९

मराठी गझलेचं खरंखुरं सीमोल्लंघन : कमलाकर देसले


सध्या 'ब्लॉग' हा इलेक्ट्रॉनिक मिडियाचा एक क्रांतीकारी टप्पा माना जातो आहे. जगभरातल्या अनेक भाषांतून ब्लॉगींग केले जाते. नुसत्या इंग्रजी भाषेतून साडेतीन कोटी ब्लॉग लिहले जातात. ही वाढ दरदिवशी होत असल्याने ती साडेतीन कोटी पेक्षा जास्त असू शकते. जगभरातल्या एकूण ब्लॉगची टक्केवारी पाहीली तर इंग्रजी ब्लॉगची टक्केवारी 36 % तर जपानी भाषिक 37 % टक्के जागा व्यापली आहे. ही टक्केवारी पहाता, हिंदी, मराठी भाषेच्या ब्लॉगची संख्या तुलनेने बज्यापैकी कमी आहे.
गेल्या वर्षापर्यंत हिंदी भाषेतून साडेतीन हजार आणि मराठी ब्लॉग विश्र्वानुसार मराठी भाषेतून जवळपास अकराशे ब्लॉगची नोंद झालेली होती. अर्थातच आता संख्येतही बज्यापैकी वाढ होत आहे. मराठी भाषेतले अनेक ब्लॉग वाचल्यावर इलेक्ट्रॉनिक मिडीयाच्या क्षेत्रातही मराठी पाऊल पडते पुढे.. चा सुखद अनुभव आल्याशिवाय रहात नाही.
उण्यापुज्या दोन वर्षात कवीवर्य श्रीकृष्ण राऊत यांच्या 'गझलकार' नावाच्या ब्लॉगची वाचनीयता एवढी वाढली की टोकियोपासून ते सन फ्रॅन्सेस्कोपर्यंत आणि स्टॅव्हेजरपासून थेट न्युनोस आटर्सपर्यंत अनेक शहरातून 'गझलकार' ब्लॉगची आतापर्यंत चौदा हजार पृष्ठे वाचली गेली आहेत. 'गझलकार' ब्लॉगमध्येच विशेषांकाचे स्वतंत्र संपादन करण्यात आले आहे. 'सिमोल्लंघन' या गझल विशेषांकात महाराष्ट्रातील विविध भागातील मान्यवर कवींच्या दर्जेदार गझलांचे संपादन वाचायला मिळते. एकवीस हजार पृष्ठांचे वाचन झालेला हा ब्लॉग म्हणजे मराठी भाषा नि मराठी गझलला खज्या अर्थाने वै्श्विक सीमोल्लंघन घडवणारा ब्लॉग आहे. अफाट वाचनियता लाभलेलया या ब्लॉगमध्ये नाशिक जिल्ह्यातील ज्येष्ठ कवी खलील मोमीन तसेच गझलेतील नवे प्रयोगशील कवी गौरवकुमार आठवले व कमलाकर देसले यांच्या दर्जेदार गझलांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. साक्रीच्या वीरेंद्र बेडसे तसेच रावसाहेब कुवर या मान्यवरांच्या गझललाही या ब्लॉगमध्ये घेतलेल्या आहेत. गेल्या वर्षी 1 मार्च 2008 ला डॉ. श्रीकृष्ण राऊत यांनी गझलकार नावाचा ब्लॉग सुरू केला. कारण घडलं ते सुदर्शन फाकिर या शायराच्या मृत्यूचं. मराठी जगतात चतकोर बातमीच्या पलिकडे या शायराची फारशी दखल घेतली गेली नाही. ती घेण्यासाठी पहिली पोस्ट लिहून, सुरू केलेला ब्लॉग म्हणजे गझलकार गझलेसंबंधी 'सबकुछ' एकत्तरिपणे देण्याचा प्रयत्न करणारा हा ब्लॉग गझलच्या वृत्तांपासून ते गझल गायकीपर्यंत संपूर्ण माहिती देतो. सुरेश भट, अहमद फराज, सुदर्शन फाकिर या उर्दू मराठीतील प्रसिद्ध गझलकार या ब्लॉगवर भेटतात. सुप्रसिध्द रेखाचित्रकार श्रीधर अंभोरेच्या रेखाचित्रांचा अल्बम, छायाचित्रकार अशोक वानखेडे यांची अप्रतिम छायाचित्रे, हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकरांच्या समवेतचे गझलगायक गुलामअलींचे दुर्मिळ छायाचित्र, उमेश पागृत, अभिषेक उदावंत आणि प्राजक्ता यांची रेखाटने दर्शकांना चांगलं पाहिल्याचा आनंद देतात.
ख्यातनाम संगणकतज्ज्ञ आणि चतुरस्त्र लेखक अच्यूत गोडबोले यांनी क्लीक करून सीमोल्लंधन विशेषांकाचे गेल्यावर्षी मुंबईतून प्रकाशन केले. गझल लिहणाज्यासाठी नि गझलच्या अभ्यासकांसाठी या वर्षीच्या सीमोल्लंघन विशेषांकात उत्तमोत्तम गझला अल्यासपूर्ण लेख, छायाचित्रे व रेखाटनाची मेजवाणी आहे. ब्लॉगचे निर्माते व संपादक कवी श्रीकृष्ण राऊत यांचा 'गझल तंत्रशुद्धता की शरणता', डॉ. अविनाश सांगोलेकरांच्या पुस्तकांचे प्रदीर्घ परीक्षण असणारा र. बा. मंचरकर यांचा मराठी गझल 1920 ते 1985 या अल्यासपूर्ण लेखासोबत अनुक्रमे संपादक श्रीकृष्ण राऊत, खलील मोमीन, कमलाकर देसले, गौरवकुमार आठवले, रविप्रकाश, श्रीराम गिरी, वीरेंद्र बेडसे, रावसाहेब कुवर, वंदना पाटील, डी. एन. गांगण या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील कवींच्या उत्तम गझला या अंकात गझलकार ब्लॉगमध्ये वाचायला उपलब्ध आहेत. सांगोला ता. पातुर जि. अकोला येथे सापडलेल्या रावणाज्या पुरातन अशा दुर्मिळ छायाचित्राचे मुखपृष्ठ सिमोल्लंघन या गझल विशेषांकासाठी घेण्यात आले आहे. मराठी भाषाच नव्हे मराठी गझलेला नवसंजीवनी देणारा हा ब्लॉग आहे. राज्यकर्तेही आज मराठीच्या काळजीचा सूर आळवतांना दिसताहेत. पण मराठीच्या जपणुकीसाठी संवर्धनासाठी फार काही होतांना दिसत नाही. म्हणूनच कवी श्रीकृष्ण राऊतांचा गझलकार हा ब्लॉग जगभर वाचला जातो. कधी पत्राने, इ-मेलने, तर कधी फोनवर सुखद प्रतिक्रिया मिळतात. मराठी गझल आता ब्लॉगद्बारे जगभर वाचली जाते. मराठी गझलचे वै्श्विक सीमोल्लंघन घडविणा-या डॉ. श्रीकृष्ण राऊतांना मराठी वाचकातर्फे सलाम.
(गावकरी/२० डिसेंबर २००९ वरून साभार)

1 टिप्पणी:

प्रमोद देव म्हणाले...

नमस्कार डॉक्टरसाहेब. आपल्याला मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराबद्दल आपले हार्दिक अभिनंदन.
आपली जालनिशी गेले काही दिवस वाचत आहे...खूपच चांगली माहिती मिळतेय गझल लेखन आणि गझल गायनासंबंधी...पण राहून राहून एका गोष्टीचे आश्चर्य वाटतंय की ह्यातल्या गायक कलाकारांमध्ये कुठेही गझलनवाज भीमराव पांचाळेंचा साधा उल्लेखही नाहीये...त्यांच्या गाण्याची झलक ऐकायला मिळणे तर दूरच...आशा आहे की ह्याचा योग्य तो खुलासा होईल.

प्रमोद देव