ख्यातनाम शायर बशीर बद्र सुप्रसिद्ध कवी लोकनाथ यशवंत यांच्या सोबत
‘आणि शेवटी काय झाले’ ह्या त्यांच्या काव्यसंग्रहातील कविता वाचतांना
उजाले अपनी यादों के हमारे साथ रहने दो,
न जाने किस गली में जिन्दगी की शाम हो जाये।
बशीर बद्रजींचा हा कालातीत 'शेर' पाकिस्तानच्या हुक्मराँपासून तर भारताच्या पंतप्रधानांपर्यंत सगळ्यांनी आपल्या खाजगी पत्र व्यवहारात सहजतेने वापरला आहे. ज्या डॉ. बशीर बद्रजींचे नाव आजच्या आधुनिक परिवेशात असदउल्लाखाँ उर्फ 'मिर्झा गालिब' यांच्या नावानंतर सन्मानाने घेतल्या जाते, त्या सदाबहार डॉ. बशीर बद्रजींची मुलाखत बुलढाणा येथील कवी अजीम नवाज राही यांच्या 'व्यवहाराचा काळा घोडा' या कवितासंग्रहाच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी झाली आणि त्यांच्या अविस्मरणीय सहवासात मी आणि अरूण आसटकर यांना तीन दिवस राहता आले. त्यांना जवळून पारखता आले. त्यांच्या सदाबहार गझलेची निर्मितीची प्रक्रिया समजून घेता आली.
लोग टुट जाते है एक घर बनाने मे
तुम तरस नही खाते बस्तिया जलानेमे।
मनाचा ठाव घेणारी सहज सोपी भाषा आणि आशय वाचकांना दुसरीकडे भटकू देत नाही. त्यांच्या शेरातून आजचे भयाण सामाजिक वास्तव 'पैमाना झलकावा' तसे झलकते आणि एक विदारक सत्य समोर येते.
दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाईश रहे
जब कभी हम दोस्त हो जाए तो शरमिंदा ना हो।
हृदयाला चिरून जाईल अशा नेमक्या आशयाची निवड ही बशीर बद्रजींची 'खासबात' आहे.
कोई हाथ भी न मिलाएगा जो गले मिलोगे तपाक से
ये नये मिजाज का शहर है जरा फासले से मिला करो !
बारीक सामाजिक परीक्षण हे बशीर बद्रजींच्या गजलेत जिथे तिथे विखुरलेले असल्याने त्यांच्या एकूणच शायरीला एक मजबुती प्राप्त होते आणि वाचक नकळत त्यांच्या गझलेशी बांधल्या जातो.
उन्ही रास्तोने जिनपर कभी तुम थे साथ मेरे
मुझे रोक रोक पुछा तेरा हमसफर कहाँ है।
बशीर बद्रच्या एकूणच लिखाणात एक चकवा सतत फिरत असतो. जो आपणाला आपल्या आजूबाजूच्या जीवनाशी सतत परिचय करून देत असतो. जे जग आपले असूनही आपल्याला अनभिज्ञ असते अशा स्थितीत बद्रजींचा 'शेर' भेटला की आपण नकळत अवाक होऊन जातो.
हजारों शब्द जो अखबार मे पत्थर के होते है।
गजल में आ गये तो रात की पलके भिगोते है।
पारंपारिक उर्दू गजलेचा चेहरामोहराच बशीर बद्रजींनी मुळापासून बदलून टाकला. साकी, मैखाना, शराब, महबुबा, प्यार-व्यार या सगळ्या जंगाटलेलया प्रतिकांना नेस्तनाबूत करून बद्रजींनी उर्दू गजलेला नवा आयाम दिला, तिला जास्तीतजास्त समाजाभिमुख केले. बदललेल्या मानवी जीवनाशी सुसंगत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
कुछ तो मजबूरीयाँ रही होगी
यो कोई बेवफा नही होता।
मानवी संबंध आणि सामाजिकता याचे सुन्दर मिश्रण बशीर बद्र आपल्या शेरातून आविष्कारतात की वाचणारा विस्मयकारकरीतया थक्क होऊन जातो.
किसने जलाई बसितयाँ बाजार क्यो लुटे,
मै चाँद पर गया था मुझको कुछ पता नही ?
समाजाचे हे विदारक सत्य जे पलायनात दडून आहे ते किती सहजतेने बशीर बद्रजींनी आपल्या शेरातून अविष्कारले आहे याला तोड नाही.
मानवी मनाची घुसमटही ते अतिशय कलात्मकतेने साकारतात. त्यांच्या कल्पकतेची उंची वादातीत आहे. मातीचा दिलकश सुगंध असलेला खरा कलावंतच या 'मुक्काम' पर्यंत पोहचू शकतो.
जिंदगी तून मुझे कब्र से कम दी है जमीन,
पाँव फैलाऊं तो दीवार से सर लगता है।
आपण आपल्या शायरीची निवड कशी करता या माझ्या प्रश्नावर बशीर बद्रजींनी गजल आविष्करणाची प्रक्रिया सांगितली. मनात सतत नवे विचार येत असतात. माझ्या मंदूची घाटणी मी विशिष्ट पध्दतीने केली असल्याने टाकलेल्या 'रूळ' वर माझ्या विचारांची गाडी बेलाशक धावत असते.
आपल्या मेंदूत जन्मणारा प्रत्येकच विचार ग्रेट असतो असे काहीही नसते. मेंदूत घुसमटणाज्या अनेक थिम्समधून आपणाला हवी असलेली थिम निवडताच मला संपूर्ण समाधान आणि आनंद झालेला असतो. या निवडणीनंतर मी एक 'तृप्ती' अनुभवतो. मला अनमोल खजाना गवसला असे माझे मनच मला सांगू लागते. हे असे अद्बितीय काहीतरी गवसले की, त्याच्या मागे माझा सतत पाठलाग सुरू होतो. पुन्हा 'त्या' दिशेचे रूळ पडतात आणि माझे मनोविश्र्व त्या वर्तुळात फिरू लागते आणि पहिल्या दोन ओळीच्या शेरानंतर संपूर्ण गजलेसाठी माझा अविरत प्रवास सुरू होतो. या प्रवासाला वेळेची मर्यादा नाही. हा प्रवास कधी संपेल याचा काही भरवसा नाही. पुढच्या ओळींचा शोध घेणे एवढीच तंद्री लागलेली असते.
इक लउकी एक लडके के काँधे पे सो गई,
मैं उजली धुंधली यादों के कोहरे मे खो गया।
२० हजार शेरांना जन्म देणारे बशीर बद्र यांनी प्रत्येक विषय समर्थपणे हाताळला आहे आणि तेही तितक्याच ताकदीने
घरों पे नाम थे, नामों के साथ ओहदे थे,
बहुत तलाश किया, कोई आदमी न मिला !
सामाजिकतेसोबत बशीरजी आपले दु:खही सांगतात. आपल्या जड हृदयाला वाट मोकळी करून देतात.
खुदा की इतनी बडी कायनात मे मैने,
बस एक शख्स को माँगा, मुझे वही न मिला !
बशीरजींच्या सहवासात असतांना एक सतत जाणवत होते की, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक चर्चेत आपल्या गजलेतील शेरांना ते सारखे शोधत असतात. निरंतर त्यांचा शोध सुरू असतो.
अखबार में तो ऐसी कोई खबर नही थी
झुलसे मकान झूठे अफसाने कह रहे थे !
खूप मोठ्या परिघाचा आशय केवळ 'शेर' च आविष्कारू शकतो, ही बशीरजींची यथार्थ मान्यता आहे.
सब लोग अपन् ो अपने खुदाओं को लाये थे
इक हम ही ऐसे थे के हमारा खुदा न था !
संपूर्ण गजलेसाठी सात किंवा आठ इतकेच 'शेर' असावे ही गजलेची तथाकथित मान्यता बशीर बद्रजी सपशेल नाकारतात. पहिला शेर कागदावर उमटल्यावर गजलेची जी मान्यता आहे ती पूर्ण करण्यासाठी 'शायर' पळवाटा शोधतो आणि त्याला आपली गजल लवकर पूर्ण व्हावी अशी घाई झाल्यामुळे गजलेचा संपूर्ण जीवच चालला जातो. त्याची वीण ढिली होऊन जाते. म्हणून एका गजलेत 'एवढेच' शेर असले पाहिजेत, या नियमाला मी ठोकरतो. माझ्या दोन ओळीचा शेरच संपूर्ण गजल आहे.
मुझे इश्तहार सी लगती है ये मुहब्बतों की कहानियाँ
जो कहा नही वो सुना करो जो सुना नही वो कहा करो
रूमानी आवाजाचे धनी जगजितसिंह यांनी गायिलेल्या आठ गजलेची सी. डी. लवकरच येत आहे. या आठही गजला बशीर बद्रजींच्या आहेत. मोटार अपघातात जगजितसिंह यांच्या एकुलत्या एक तरूण मुलाचे दु:खद निधन झाले. या आठ गजलेतील बद्रजींचा एक शेर जगजितसिंह शेवटपर्यंत गाऊ शकले नाहीत-
हजारो शेर मेरे सो गये कागद की कब्रो में
अजब माँ हू कोई बच्चा मेरा जिन्दा नही रहता
24 तास गजलेल्या धुंदीत आणि शोधात असलेल्या डॉ. बशीर बद्रजींचा सहवास जपून ठेवण्यासारखा आहे. दुनियेकडे आणि एकूणच जीवनाकडे बधण्याचा त्यांचा ञ्ृष्टिकोन वेगळा आहे. बद्रजींचा ताजातरिन शेर असा-
समंदर को समजझना है तो उसकी तह में टहलाकर,
ये तो साहील है यहाँ मछलियाँ कपडे बदलती है !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा