८ ऑक्टोबर, २००८

दोघे : उ.रा.गिरीये गडे बागेत थोडे थांबुयाना;
या फुलांपाशी जरासे बोलुयाना.

चांदणे हे आज बागेश्री प्रमाणे,
लोचनांनी धुंद आता गाऊयाना.

चुंबनाचा लाजरा छेडू तराणा;
सूर वा-याला सुगंधी देऊयाना.

रात्र आहे आजची झंकारलेली;
गात्रगात्री गोंदुनी ती घेऊयाना.

ही घडी वेडे पुन्हा येणार नाही;
ये निळे आभाळ दोघे होऊयाना.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: