स्वाद सुखाचा जरा घेतला
तिच्या घरी आसरा घेतला
मधुशाळेतुन निघता निघता
पानाचा तोबरा घेतला
सोने आता परवडते का?
रुपयाचा मोगरा घेतला
"प्रीत"... वगैरे, बरळुन गेलो
अर्थ तिने पण खरा घेतला
घरात राडे नकोत म्हणुनी
पंगतीस सासरा घेतला
टवाळखोरी, पुरे ’अगस्ती’
म्हणून मी कासरा घेतला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा