२३ ऑक्टोबर, २०१२

डॉ.अविनाश सांगोलेकर : दोन गझला




१.
बाबा

काय झाले आज, बाबा?
ना कशाची लाज, बाबा.

जातिअंताची लढाई,
हरवला तो साज,बाबा.

झोपडी अंधारलेली,
मात्र झळके ताज,बाबा.

राहिली ना माणसे ती,
राहिला ना बाज,बाबा!

ऐकतो ‘अविनाश’ आता,
दूरची ती गाज,बाबा.


२.
बापू

येत नाही का कुणाला वास,बापू?
देश फिरुनी होत आहे दास,बापू!

जाहले दु:खी उगा ना ते हुतात्मे,
विसरलो आम्ही तयांचे फास,बापू!

शोधुनी का सापडेना ती अहिंसा?
राहिली ना बांधवाना आस,बापू!

चालली आंदोलने जोरात आता,
ती खरी की फक्त आहे भास,बापू?

रात्र वैर्‍याची तरी हा देश झोपे,
जागतो ‘अविनाश’ आता खास,बापू!
__________________________

डॉ.अविनाश सांगोलेकर,
प्राध्यापक,मराठी विभाग,
पुणे विद्यापीठ,पुणे.





























कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: