कुणास कळते ह्रदयाची कळ;
अपुले आपण असतो केवळ.
असे कसे हे अपुले नाते-
मला घाव अन् तुला कसे वळ?
कुठून आणू उसने मागुन,
पुन्हा पुन्हा मी जगण्याचे बळ.
कितीक द्यावी स्पष्टीकरणे;
कितीक आपण काढावा पळ.
तुला भेटुनी खरेच पटले
उगीच नव्हती माझी तळमळ .
तुला बिलगुनी आला वारा...
इथे अचानक सुटला दरवळ.
- अमोल शिरसाट
९९२२६४६००२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा