१८ मार्च, २००८

हातघाई

एकट्याची हातघाई चालली;
ही स्वतःसंगे लढाई चालली.


रे भिकाऱ्यांनो! लुटा ही देवळे;
देवतांची गाईगाई चालली.

बांधतो आहे बुटाचे बंध मी;
फाटक्या चपलेत आई चालली.

घेऊनी थैली रिकामी परतलो;
शेर ना माझी रुबाई चालली.

झाक वेड्या नाकडोळे आपले;
बंगल्यामध्ये मिठाई चालली.

वाचणारा एकही नाही मला;
चालली, वायाच शाई चालली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: