हे असे का रोजचे येणे तुझे;
कोणते माझ्याकडे देणे तुझे.
आठवावे सांजवेळी सारखे,
हात हे हातामधे घेणे तुझे
मी कसा झाकू छताला मोडक्या;
उंबर्याशी थांबले मेणे तुझे
हासला माझ्या घराचा कोपरा;
बोलणे का ऐकले तेणे तुझे.
कोणत्या मातीत होते कोरले;
फार झाले देखणे लेणे तुझे.
वाहतो आयुष्य मी पायी तुझ्या
ऋण फिटावे थोडके जेणे तुझे.
या भुईने कोठवर सोसायचे
मेघ हे वार्यावरी नेणे तुझे!
- वंदना पाटील
07267 - 285125
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा