२८ मार्च, २००८

जाहिरात

लावली छातीस माती;
सुर्य आला सहज हाती.

देव नाही देत भाकर;
सांगतो ठोकून छाती.

हात केला वर जरासा,
लागले आकाश हाती.

बंद खिडक्या बंद दारे;
स्वागताच्या जाहिराती.

रक्त जेव्हा थंड होते;
बंद पडते सर्व क्रांती.

जा विचारा विट्ठलाला;
फालतू आहेत जाती.

कोरडा पाऊस आला;
अन् करपली सर्व नाती!


-अभिषेक उदावंत
९९२२६४६०४४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: