२६ मे, २००८

कमाई

आयुष्याची तूच कमाई;
बाकी दुसरे काही नाही.

याच्यानंतर जेव्हा भेटू;
अपुल्याबद्दल बोलू काही..

तुला पाहिजे तसा वागतो;
म्हणून माझी किंमत नाही.

तोंडावरती गोड बोलतो,
पण माघारी सुरू लढाई..

जेव्हा आपण खोटे पडतो;
देतो त्यावर किती सफाई.

असे बोलतो आपण दोघे;
जसे आपले काही नाही.

तूच बोलली मला स्वतःहुन:
मनात माझ्या नव्हते काही..

नंतर बसतो घंटोघंटे;
आधी करतो उगीच घाई.

-अभिषेक उदावंत
९९२२६४६०४४

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: