८ मे, २००८

कविता जिवास सलते

हलक्याच चांदण्याची अलका अशी उमलते;
पाऊलवाट वेडी भलतीकडेच कलते.

हे शिल्प सावल्यांचे ठिपके सहस्त्र ल्याले;
स्वप्नातुनी हिमानी गाणे निळे भटकते.

वार्‍यात दर्दओली बंदीश गारव्याची,
लय एक लाजवंती स्पर्शातुनी बिथरते.

घडले ‘तसे’ न काही रानात राजवर्खी;
अमिताभ अर्थगर्भा कविता जिवास सलते.


- उ.रा.गिरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: