१० मे, २००८

मी अंथरतो अन् पांघरतो : दुष्यंतकुमार

मी अंथरतो अन् पांघरतो,
ती गझल तुम्हाला ऐकवतो.

तुझ्या लोचनी जंगल आहे;
मी वाटच जेथे विस्मरतो.

रेलगाडीसम तू जाशी अन्
पुलापरी मी थरथरतो.

नाराजीचे सूर सभोती-
प्रकाशात मी जेव्हा असतो.

एक हात निखळल्यापासुनी
जास्त वजन मी उचलत असतो.

विसरायाच्या प्रयत्नात मी,
तुझ्याच अगदी निकट असतो.

कोण निभावून नेईल अंतर?
देवदूत मी- खरे सांगतो.


(अनुवाद : सदानंद डबीर)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: