२ जून, २००८

मी सुखाला बडे केले

मी सुखाला बडे केले;
संकटा एवढे केले!

देव झाली नवी दारू;
शेकडो बेवडे केले.

मारले तर अमर होतो;
त्यास मी लंगडे केले.

अंगणे मग सरळ झाली;
पाय मी वाकडे केले.

माय मेली नशीबाची;
बोट माझ्याकडे केले.

- तुळशीदास खराटे
९९२१२९७२७९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: