दाटी अशी दुतर्फा भलत्याच चेहर्यांची;
चव अमृतास इथल्या काडे चिराइताची.
या चिल्खती तमाचा माझ्यावरी पहारा;
दररोज अंत्ययात्रा माझ्या मनोगतांची.
माघार घेत आलो मी नित्य एकतर्फी;
तलवार गंजलेली हाती पराभवाची.
ओलांडले तरीही पन्नास पावसाळे;
विझवून वीजगीते वक्षात वादळांची.
आता उगाच बेटा मध्यस्थ पंचनामा;
अर्थाविनाच कोरी चिरफाड आशयाची.
- उ.रा.गिरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा