८ जून, २००८

श्रीमंत सूर्य अमुचे

श्रीमंत यातना या श्रीमंत दु: अमुचे;

डोळ्यात सप्तसिंधू श्रीमंत आसवांचे.


श्रीमंत ह्या व्यथांचा श्रीमंत शापगाथा;

श्रीमंत गीत ओठी श्रीमंत वेदनांचे.


श्रीमंत घाव हृदयी श्रीमंत भूक पोटी;

प्रासाद उंच अमुच्या श्रीमंत हुंदक्यांचे.


श्रीमंत शोकनाट्ये श्रीमंत आत्महत्या;

ओलीस मृत्युपाशी श्रीमंत जन्म अमुचे.


काळोख सज्ज तुमचा झाकावयास सत्ये;

गाती प्रकाशसूक्ते श्रीमंत सूर्य अमुचे.

- उ.रा.गिरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: