१४ जून, २००८

अभिप्रेत

याद माझी येत नाही हे ख्ररे का?
त्रास थोडा देत नाही हे खरे का ?

तू निघावे अन् तुला मी थांबवावे
हे तुला अभिप्रेत नाही हे खरे का ?

जाळते आहे जिवाला खूप जी,...ती
वेदना गझलेत नाही हे खरे का ?

खूप आहे आज पैसा ...पण मनाला
तो दिलासा देत नाही हे खरे का ?

हाय! जे पावित्र्य होते काल तेथे....
आज ते गंगेत नाही हे खरे का ?


- अमोल शिरसाट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: