नको फिरू तू उन्हात तपत्या वणवण पोरी;
तुझीच काया बनते आहे जळतण पोरी.
खोडलेस तू लिहिता लिहिता नाव जरीही,
कसे खोडशी हृदयावरले गोंदण पोरी.
दु:ख लपवले, सांगतात पडलेल्या भेगा;
तरी कितीदा तू सारवते अंगण पोरी.
स्वप्न जेवढे सुंदर तितके कुरूप वास्तव;
पहा स्वप्न तू, सोड पाहणे दर्पण पोरी.
घासलेटच्या आणि विषाच्या दिल्या बाटल्या;
काय द्यायचे तुला आणखी आंदण पोरी.
- अमित वाघ
९८५०२३९८८२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा