३० ऑगस्ट, २००८

आसपास

काय हा तुझाच भास?
तू इथेच आसपास.

कोण ती उभी उन्हात;
सावलीस ये सुवास.

जीव तूच लावितोस;
लावुनी जिवास फास.

कालचीच तीच भूक;
आजही पुन्हा उपास.

तोच घाट, तीच वाट;
झाड एकटे उदास.

जायचे उद्या इथून;
टाकुनी इथेच घास.

- वसंत केशव पाटील
९७६७७५१२३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: