८ ऑक्टोबर, २००८

प्रतीक्षा : स्व. व्यंकटेश देशमुख




ती पुस्तके निकामी, नापास त्या परीक्षा;
झोळीत चाक-यांची ज्या मागतील भिक्षा.

मी जन्म घेतल्याचा अपराध मान्य केला;
आयुष्य कंठण्याची केली कबूल शिक्षा.

कसलीच आसवांना प्रस्तावना जमेना;
कसलीच वेदनेची करता न ये समीक्षा.

स्वातंत्र्य सूर्य आला घेवून दोन गोष्टी;
हस्तांतरीत सत्ता भाषांतरीत दिक्षा.

आता परस्परांना डोळे मिटून पाहू;
ये,संपवू मुक्याने भेटीतली प्रतीक्षा.

1 टिप्पणी:

Sameer म्हणाले...

prastavanecha sher bahot badhiya