८ ऑक्टोबर, २००८

ही प्रेमाची जात कोणती : अशोक थोरात




ही प्रेमाची जात कोणती?
उजेड कोठे,कोठे पणती!

आनंदाला तोटा नाही;
दु:खाचीही नाही गणती.

गेली कोठे शाळा माझी?
केवळ घंटा का खणखणती?

आक्रंदन हे चहू दिशांनी;
लोक तरीही गाणे म्हणती!

घाव शेवटी घावच असतो;
काही मरती,काही कण्हती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: