८ ऑक्टोबर, २००८

तुका : अमित वाघ




आला कधी अचानक परतून जर तुका;
मारून ठार त्याला भजतील पादुका.

पाहून आरसा तू केलीस वर नजर;
अन लाजल्या अधाशी बागेतल्या चुका.

नाही तिला जराही जर खंत कोठली;
मग का असा स्वत:ला तू कोसतो फुका..?

ओले करून गेली आजन्म ती मला;
ढाळून एक अश्रू डोळ्यातला सुका.

मी बोललो जरा की आकाश फाटते;
येतो भुकंप जेव्हा मी राहतो मुका.

मो. ९७६६६९७६६७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: