१३ मार्च, २००९

५. निष्कर्ष



जगाची काळजी संभावितांना
कण्हाया लागती दारू पितांना

तसा झुंजार तो नावाजलेला
तसा नावाजला गेला भितांना

अहो ह्या पंगतीला अंत नाही
अता पत्रावळी खाती शितांना

भुकेलेल्या, तुझी पूजाच खोटी
हवे अश्रू तिच्या दैवी स्मितांना

दगा केला पुन्हा सामुद्रिकांनी
चला शोधू फरारी भाकितांना

कसे ते झुंजले प्रस्थापितांशी
विचारा ह्या नव्या प्रस्थापितांना

दिसे हे रक्त साध्या माणसांचे
कुणी मारी न चाकू प्रेषितांना

इथे ज्वाळांविना काहीच नाही
फुले मागू नये कोणी चितांना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: