Related Posts Plugin for WordPress, Blogger...

१८ एप्रिल, २००९

खिन्न शेते


पिके वाळलेली ,उभी खिन्न शेते;
स्मशानाहुनी भासती खिन्न शेते.

कितीदातरी सांडले रक्त आम्ही;
कितीदातरी वाळली खिन्न शेते 

कडूनिंब बांधावरी अश्रु ढाळे,
कशाने अशी जाहली खिन्न शेते 

असे मुक्तता आत्महत्याच ज्याची,
धन्याची चिता पाहती खिन्न शेते 

नवे हात आलेत राबावयाला;
पुन्हा जोगवा मागती खिन्न शेते.

-अनंत ढवळे 
९८२३०८९६७४

1 comments:

Santhosh २२.४.०९  

अच्छी ब्लॉग हे / मराठी और हिन्दी मे टाइप करने केलिए आप कौनसी टाइपिंग टूल यूज़ करते हे...? रीसेंट्ली मैने यूज़र फ्रेंड्ली इंडियन लॅंग्वेज टाइपिंग टूल केलिए सर्च कर रहा तो मूज़े मिला " क्विलपॅड " / आप भि " क्विलपॅड" www.quillpad.in का इस्तीमाल करते हे क्या..?

गझलकडे वळा ! - भालचंद्र नेमाडे

‘‘सध्या मुक्तछंदाच्या वापराने मराठी कवितेला दारिद्र्य आले आहे. म्हणूनच एकाचवेळी विविध विषय समर्थपणे पोहोचवणा-या व वृत्तसौंदर्याने नटलेल्या गझल प्रकाराचा स्वीकार-अंगिकार मराठी भाषेला आवश्यकच ठरणार आहे’’ - असे उद्गार सुप्रसिद्ध साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी मुंबई विद्यापीठात गझल प्रकारावर झालेल्या परिसंवादाच्या अध्यक्षपदावरून काढले. (वृत्त - महाराष्ट्र टाइम्स, दि.७-४-२००४)

Ghazal in English :


English
- Chandrani Chatterjee / Milind Malshe

डॉ.श्रीकृष्ण राऊत : गझल सादर करताना

तुझ्या गुलाबी ओठांवरती : रफिक शेख

नामवंत सिने दिग्दर्शक राजदत्तजी ‘गझलकार’ सीमोल्लंघन विशेषांकाबद्दल बोलताना :

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ

प्रख्यात समाज सेविका सिंधुताई सपकाळ
सीमोल्लंघन २०११ चे प्रकाशन करताना

  © Blogger templates Newspaper III by Ourblogtemplates.com 2008

Back to TOP