२४ मे, २००९

मीच हिन्दुस्थान आहे



मीच दिल्ली,मीच केरळ,मीच हिन्दुस्थान आहे;
मरणही माझे भुईला कुंकवाचे दान आहे.

अस्मिता माझी नसातुन थिरकते आहे तरीही
पैंजणांच्या घुंगरांना उंब-याचे भान आहे.

ऐकतो आहोत आम्ही संस्कृतीचे जे पवाडे
ते पराभुत माणसांचे घातकी सहगान आहे.

बाबरी मस्जिद असो वा जन्मभू पुरुषोत्तमाची,
माझियासाठी अयोध्या आदराचे स्थान आहे.

वाह रे वेडा! म्हणे की भाकरीला पीठ नाही;
बघ जरा रंगीत टी.व्ही.अन समज रमजान आहे.

सांगतो विझणार नाही घोषणांच्या पावसाने;
हे फुलांच्या हुंदक्यांनी पेटलेले रान आहे.

शेवटी पण एक निश्चित-ते मला टाळू न शकती;
मी युगाच्या वादळाने घेतलेली तान आहे.

- कलीम खान
  ९९६०३६०१३०


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: