४ जानेवारी, २०११

॥ श्रीकृष्ण राऊत विशेषांक ॥



दि.९ जानेवारी २०११ ला अमरावती येथे मराठी गझलोत्सव साजरा होतोय.गझलोत्सवात दरवर्षी मुंबईच्या बांधण जनप्रतिष्ठान तर्फे ज्येष्ठ मराठी गझलकाराला जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. या वर्षी हा पुरस्कार ज्येष्ठ मराठी गझलकार श्रीकृष्ण राऊत यांना रसिकराज नामदार सुशीलकुमारजी शिंदे यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात येईल.अकरा हजार रुपये रोख,शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या निमित्ताने मराठी गझलवर मनस्वी प्रेम करणार्‍यांसाठी गझलकार ब्लॉग तर्फे नववर्षाची एक खास भेट उपलब्ध होणार आहे.श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी गझलांचा विविध अंगांनी वेध घेणारा एक विशेषांक दि.७ जानेवारी २०११ ला प्रकाशित होत आहे.या अंकाचे संपादन प्रख्यात समीक्षक डॉ.किशोर सानप करीत असून प्रस्तुत अंकात डॉ.किशोर फुले, डॉ.मधुकर वाकोडे,वसंत केशव पाटील,सदानंद डबीर,प्रा.श्रद्धा पाटील,कमलाकर देसले,सुधाकर कदम,डॉ.अविनाश सांगोलेकर,श्रीराम गिरी,गंगाधर मुटे,प्रा.अशोक इंगळे,प्रा.राजेंद्र मुंढे,सुधाकर जाधव आणि डॉ.किशोर सानप इ. लेखक श्रीकृष्ण राऊत यांच्या मराठी गझलचे विभिन्न पैलू उलगडून दाखवणार आहेत.

या विशेषांकात पत्रांचा स्वतंत्र विभाग असून त्यात ना.घ.देशपांडे,मंगेश पाडगावकर ,नरेंद्र लांजेवार यांच्या पत्रांचा समावेश आहे.


*श्रीकृष्ण राऊत*
॥ विशेषांक ॥



॥ श्रीकृष्ण राऊत विशेषांक येथे वाचा ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: