काय ते राहिले
काय ते राहिले बोलण्यासारखे;
प्रेम नाही तुझे चांदण्यासारखे.
विसरणे एवढे सहज नाही गडे;
नाव लिहिल्यावरी खोडण्यासारखे.
हात हाती तुझा राहिला ना अता;
काय मग राहिले सोडण्यासारखे.
भेटता तू मला अंतरी वाटते,
हात देवापुढे जोडण्यासारखे.
प्रेम देशील तर प्रेम मिळते इथे;
हे उधारीत ना मांडण्यासारखे.
dgavande42@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा