जमलेच नाही
मज व्यथांशी बोलणे जमलेच नाही .
आसवे सत्कारणे जमलेच नाही.
तू फुलांची बात का करतेस आता
मज फुलांवर भाळणे जमलेच नाही.
सांगतो आहे कधीचा पारवा तो
या भुईवर नांदणे जमलेच नाही.
चेहरा शाबूत ठेवावा कसा मी
मुखवटा सांभाळणे जमलेच नाही.
चालले हातातुनी सर्वस्व माझे
मज सुखांना सांधणे जमलेच नाही.
घातला गळफास प्रेमाने असा तू
समजल्यावर उमजणे जमलेच नाही.
बोलल्या भिंती घराच्या आज काही
माणसांना समजणे जमलेच नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा