८ ऑक्टोबर, २०११

संजय इंगळे तिगावकर : एक गझल
























तू न यावे असे



तू न यावे असे रोज भेटायला


गाव हे लागले आज बोलायला



का फुटे पालवी माळरानास या ?


का ऋतू हा असा लागला गायला ?



कालच्या वेदना संपल्या ना जरी


का पुन्हा दु:ख आलेच भांडायला ?



सूर माझ्या गळ्याला छळू लागला


ऊर लागे हवेचाच दाटायला.



प्राण कंठातुनी ना जरी त्यागला,


लोक गोळा कसे लागले व्हायला ?



ओठ माझे मुके, बोलली तू कुठे ?


ही गझल लागली आज बोलायला


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: