"नाही दिवा जरीही पडक्या घरात माझ्या;
मी सुर्य पाळलेला आहे उरात माझ्या."
प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत सरांची ‘वीज’ ही गझल अकरावीच्या युवकभारती मध्ये या वर्षी समाविष्ट झाली आहे....त्या गझलेचे अंतरंग मांडणारे काही करिश्मे........!
“
अभ्यासाच्या दावणीत ,अभ्यासू चेहरे जवळून निरखून बघतांना,चेहर्याआड दडलेली अनुभवांची काळीकुट्ट ,एकात एक गुंतलेली जळमटं...लक्ष वेधून घेतातच.......विजेचे......!
या गझलेत गिरवलेले धडे संकटांनाही चक्रावून सोडतील इतके जालीम आहेत...वीज पत्करल्याशिवाय अपरंपार प्रेमाची आणि निरंतर यशाची प्राप्तीच होत नसते असे शिकवणारी प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत सरांची ‘वीज’ ही गझल अकरावीच्या युवकभारती मध्ये या वर्षी समाविष्ट झाली आहे....त्या गझलेचे अंतरंग मांडणारे काही करिश्मे........!
वाणिज्य क्षेत्रापलीकडे जाऊन स्वतंत्र सामाजिक अभ्यासाचा आणि त्यावर आधारित लेखनाचा प्रवास करत वय वर्षे २८ उन्हं पावसाळे सोसलेली, अत्यंत आव्हानात्मक आणि परीक्षा पाहणार्या प्रारंभीच्या टप्प्यात ‘वीज’ गझल जगात पावले ठेवण्यासाठी खंबीर उभी ठाकली .या ‘वीज’ गझलेच्या भटकंतीत जे हाताशी लागलं ते अनेकरंगी होतं.त्यात गुंतागुंतीचे ताणेबाणे होते.फुटकळ भावनेच्या उन्मादापासून आयुष्यभराच्या वैफल्याच्या काळ्याश्यार डोहापर्यंतचे हेलपाटून टाकणारे हिंदोळेही होते. अनंत आव्हान,प्रदीर्घ साहस आणि पात्रतेची कसोटी ‘वीज’ ही गझल आहे. आजवर राज्य सरकारच्या अभ्यासक्रमाला फास्ट फूड ची कळा आली होती, ना चव ना सत्व! चुरचुरीतपणाच फार.....!
आऊटडेटेड झालेले काही तपशील आणि नव्या जमान्याचे बोट पकडत स्वीकारलेले काही नवेकोरे बदल एवढ्या पुरताच शैक्षणिक द्ष्टीकोण न ठेवता माध्यमशक्तीच्या अचाट ,अफाट अवाक्याने थेट अभ्यासमंडळाचा ताबा घेत नवा क्रांतिकारी बदल घडविला.सत्ता आणि जबाबदारीने हक्कापाठोपाठ मराठी मातीच्या उराशी विदर्भाच्या नंदनवनात फुलणार्या, फळणार्या गझलेने
कौतुकांची उतरंड मांडली आणि अभ्यासक्रमात समाविष्ट होण्याचा भूगोलही स्वतंत्रपणे आखला आहे.
प्रा.डॉ. श्रीकृष्ण राऊत सर मराठी गझलेचं संगोपन करणारं आणि थेट गझलेलाच सत्कारणी,सन्मार्गी लावणारं नाव.....निव्वळ आक्रस्ताळ्या कल्पनेच्या बेमुर्वत दलदली विरुद्ध ,संताप पेटलेल्या देशात
भ्रष्टतेने बरबटलेल्या सिस्टम कडे बोट दाखवणारी गझल अकरावीच्या पुस्तकात वाचतांना सांगून जाते.......कागदाला काळं करण्याएवढं जमिनीला हिरवं करणं सोपं नसतं...गझलेची भाषा वर्चस्वाची असू नये सह -अस्तित्व हा गझलेचा धर्म आहे असायलाही हवा.पाठीवर दप्तराचं ओझं घेऊन मार्कांच्या शर्यतीत मुकाट धावणार्या विद्यार्थ्यांना हवीच होती कवितांच्या यादीमध्ये एखादी भन्नाट आणि सोप्पी ,रांगडी गझल .....या वर्षी गझलेने अभ्यासक्रमात शोधलंचं हक्काचं माहेर ...! शेती मातीत राबणारी गझल असो की मॉल च्या लायब्ररीत खितपत पडलेली गझल ...आज प्रसिद्धीचे पंख लावून उडण्यासाठी धडपडली आणि तिचं नातं बदलत्या काळाबरोबर नवी रुपं घेऊ लागलं.........
या गझलेच्या समुद्रात उडी मारणारे ...काही तरतात...काही बुडतात..काही सतत हातपाय मारतात,पण जगतात!
सुख-दु:खाची ,जिद्दीची.नैराश्याची त्यांची म्हणून स्वतंत्र दुनिया आहे. लोळागोळा होऊन आत्मविश्वासाच्या पायाशी वळवळणारी ,एक संधी मागणारी .कधी संतापाची खुन्नस धरून ,स्वाभिमानाने ताठ मानेनं उभी राहणारी,तर कधी लाचारीचा कळस गाठून जन्माची गुलामी कबूल करणारी ही दुनिया आणि या दुनियेसाठी हजारो चंद्राचा प्रकाश आपल्या वाटेवर सारा काळोख प्राशून लख्ख लख्ख करणारी ‘वीज...’ उर फुटेस्तोवर धावणार्या कितीतरी ढगांतून आपल्या आगमनाची डरकाळी फोडते.आणि अवघा आसमंत दीपवून टाकते. यशाच्या एका दिवसाची वाट पाहण्यात अनेकांची अनेक वर्षे निघून जातात......शरीराबरोबर मनही थकत जातं.....अपयशाचे ,अवहेलनेचे टक्केटोणपे पचवावे लागतात....त्यात उमेद संपली तरी पर्याय नसतोच,कारण दोर स्वत:च्याच हाताने कापून टाकलेले असतात.पुढे मार्ग सापडला तर चालायचं,नाहीतर चकव्यात अडकल्याप्रमाणे गोल गोल गटांगळ्या खात आहे तिथंच भिरभिरत राहायचं......रक्तबंबाळ करणारी धडपड ,मनाशी चालणारं अविरत भांडण अनुभवलेल्या प्रत्येक जगणार्यासाठी..जगण्याचा संघर्ष खूपच तीव्र करत जीवघेण्या, पदोपदी परीक्षा पाहणार्या काळात जगाच्या काळ्याकुट्ट गुहेत स्वत:चं अबाधित,अढळ स्थान शोधण्यासाठी चाचपडत राहायचं ...पाच ...दहा ..पंधरा....पंचवीस...वाट्टेल तेवढी वर्ष! सोप्पं नाही .यश मिळालं तर ठीकच,पण अपयशाला सामोरं जावं लागलं तर ..? हे एका गझलेच्या प्रत्येक शेरातील वेगवेगळी पात्र ...हे हजारो अगदी तुमच्या आमच्या सारखेच आहेत.जिव्हारी लागणारी त्यांची धडपड ...मनाशी चालणारं अविरत युद्ध आपणही रोज अनुभवतोच....क्षेत्र निराळी असतील , संदर्भ वेगळे असतील ,महत्वाकांक्षांची तीव्रता निरनिराळी असेल ,पण या सार्या गोष्टी जिंकायची धडपड मात्र सर्वत्र सारखीच आहे....आपण सारी पात्र आहोतच वेगवेगळ्या संदर्भात....!
"बघतो अता कसा हा पाऊस येत नाही;
मी वीज पेरली रे ह्या वावरात माझ्या!"
संकटाना धुडकावून लावत स्वत:च्या हिंमतीवर पाय रोवून ताठ मानेनं उभे राहू पाहणार्या अकरावीच्या विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या अभ्यास मंडळाने पायाभूत भाषेच्या सहभागाने भेट दिलेली ‘वीज’ ही गझल पाच वर्षाआधीच रौप्यमहोत्सवी वर्ष पाहून गेली आहे.भोवतीच्या वलयाने न बिचकता विख्यात गझलकारापुढे अत्यंत नम्रतेने पण स्पष्टपणे आशावाद निर्माण करण्याची हिंमत विद्यार्थी मनामध्ये रुजू लागल्याची जणू साक्षच या गझल युवकभारती प्रसंगाने दिली. मराठी माणसाच्या बदलत्या जीवनपद्धतीचं.....कूस बदलणार्या विचारविश्वाचं...आणि प्रगल्भ,रसिकसक्त होत जाणार्या सौंदर्यद्रूष्टीचं... शेतकर्यांच्या बदलत्या पिढ्यांच्या पालटणार्या चेहर्याचं.... वीजेचं ...असं असणं
- तर कडवी परीक्षा घेणारं एखादं अवघड अनपेक्षित आव्हान सरांच्या आयुष्याने अलगद त्यांच्या दिशेने फेकलं.........आणि वीजेनं स्वत:लाच बजावलं.....छळणार्या मर्यादा ओलांडून आखलेल्या रेघांबाहेर थेट पाठ्यक्रमातचं पाऊल ठेवलं....
प्रश्न असतांना,समस्या असतांना काटेरी मार्ग असतांना भरभरुन आशावाद देणारी गझल....आणि कवितांच्या रेलचेल मधून अभ्यासमंडळाच्या निवडीचे कौतूक करावे तेवढे कमीचं.....! आणि ह्र्दयाची ओंजळ काठोकाठ भरुन प्रा.डॉ.श्रीकृष्ण राऊत सरांचे अभिनंदन......!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा