२३ ऑक्टोबर, २०१२

दिनेश गावंडे : एक गझल



माझे डोळे

तुला पाहता तुझेच झाले माझे डोळे;
माझे म्हणण्या नाही उरले माझे डोळे.

अजून पुरता नाही कळलो कसा तुला मी;
मला पाहण्या कां न घेतले माझे डोळे.

तुझ्या घराचा दिवाणखाना सखे सजवण्या...
अश्रूंचे बघ झुंबर झाले माझे डोळे.

आलीस सखे साज चढवून जरी उन्हाचा;
इथे दंवाचे आतुरलेले माझे डोळे.

खळाळून तो हसणारा मी बुद्ध पाहिला;
ध्यानासाठी जेव्हा मिटले माझे डोळे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: