गझल हा जसा कवितेचा सशक्त आकृतीबंध आहे तसाच तो गायनशैलीचा विशेषप्रकारही आहे. फारसीतून उर्दूत आणि त्यानंतर अनेक भारतीय भाषांमधे हा काव्यप्रकार आला.प्रत्येक भाषेत गझलने आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले.आवडीने गझल ऐकणार्या चाहत्यांची संख्या जगात फार मोठी आहे.मराठी मुलुखालाही गझलने चांगलेच वेड लावले आहे.उर्दूच्या ख्यातनाम शायरांचे गझलसंग्रह आज देवनागरी लिपीत उपलब्ध आहेत. अशा गझलच्या कला आणि कौशल्यासंबंधी सबकुछ देण्याचा हा एक प्रयत्न.
२३ ऑक्टोबर, २०१२
राजीव मासरूळकर : एक गझल
बाजार झालो
उष्ण झालो गार झालो;
मी खुला बाजार झालो.
तोलुनी आभाळ सारे;
मी भुईला भार झालो.
पंख मी फैलावले अन्
माणसांनो , घार झालो.
त्या फुलाने स्मित केले-
मी उरी गंधार झालो.
घेतली माघार थोडी;
तोच फुसका बार झालो.
मी खर्य़ाचे ढोँग केले-
इश्वरी अवतार झालो.
लागता थोडा उन्हाळा;
मी पुन्हा लाचार झालो.
मी खरे बोलून गेलो;
लोकहो , गद्दार झालो.
घेतली स्वेच्छानिवृत्ती;
मी घरी भंगार झालो.
घेतला मी पेट आणि
अमृताची धार झालो.
चुंबिले तू मज असे की
तत्क्षणी मी ठार झालो!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा