२६ मार्च, २००८

बस जराशा मी पणाने


तोडली तू सर्व नाती बस जराशा मी पणाने;
राहिले काही न हाती बस जराशा मी पणाने.

वाहवा करुनी तुझी बघ काम त्यांनी काढले;
अन् तू फुगवली फक्त छाती बस जराशा मी पणाने.

लोक आता त्रासले, कंटाळले दुर्लक्षिण्याला;
एकदा घडणार क्रांती बस जराशा मी पणाने.

आसमंती पोचली असली तुझी किर्ती जरीही;
शेवटी होणार माती बस जराशा मी पणाने.

मारल्या गेलेत लाखो,मारल्या जातील लाखो;
लोक झाले आत्मघाती बस जराशा मी पणाने.

- अमित वाघ
९९६०१३३५६०

1 टिप्पणी:

मोरपीस म्हणाले...

बस जराशा मी पणाने हे आपण कोणाला उद्देशून म्हटले आहे?