१५ मे, २००८

दोघातली कहाणी

दोघातली कहाणी दोघात राहुदे;

मिटवून चांदण्यांचा अध्याय ठेवुदे.


मारूबिहाग अधुरा माझ्या-तुझ्यातला;

शहनाईच्या स्वरांना चुंबून घेउदे.


निर्गंध स्वस्तिकांचा मार्गी तुझ्या सडा;

माझ्या मुक्या फुलांना माघार घेउदे.


घायाळ पैंजणांना निष्ठूर का सजा?

गर्भार वेदनेला मेंदीत रंगुदे.


बेदर्द प्राक्तनाची ही घातकी तर्‍हा
बिनशर्त कुंकुमाला सौभाग्य कोरुदे.


दोघातली कहाणी दोघात राहुदे;

उध्वस्त एक गाथा अज्ञात राहुदे.

- उ.रा.गिरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: