आज कोणी संत नाही जाणतो मी;
ही कुणाला खंत नाही जाणतो मी.
सांधणारा माणसाच्या काळजाला
तोच आज जिवंत नाही जाणतो मी.
मी भिकारी एवढे ठाऊक होते;
देवही श्रीमंत नाही जाणतो मी.
हा भुकेचा भक्त आहे फक्त येथे;
हा खरा ‘तो’ पंत नाही जाणतो मी.
मारता का पत्थरासाठी मला ह्या;
मंदिरी भगवंत नाही जाणतो मी.
- श्रीराम गिरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा