८ ऑक्टोबर, २००८

मित्रा : अविनाश सांगोलेकर





लक्षात ठेव मित्रा;
हृदयात देव मित्रा.

फुटले कसे गुरूंचे
आताच पेव मित्रा.

धर्मास मान्य नाही;
ही देवघेव मित्रा.

अंधार माजलेला;
तू दीप तेव मित्रा.

‘अविनाश’गोष्ट सांगे
की सत्यमेव मित्रा.

मो. ९८५०६१३६०२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: