संस्कृतीचे काय जाते, भोगतो त्यालाच कळते;
सभ्यतेच्या आश्रयाला रोज येथे पाप वळते.
शोषणाला अंत नाही,राज्य हे येवो कुणाचे;
पीठ खाते श्वान येथे,आंधळे हे रोज दळते.
स्वच्छता अभियान त्यांचे,भाषणेही स्वच्छ त्यांची;
गाडगेबाबा पहाहो, वस्त्र हे तुमचेच मळते.
काय होते दंगलीने गोधरा हो वा अयोध्या;
मारला माणूस जातो माणसांचे गाव जळते!
धुर्त सारे लाटताती लोकसेवेचाच मेवा;
राबणारे हात खाली, दैव भलत्याचेच फळते.
मो. ९४२१५०७४३४
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा