मी शब्द बोललेला झाला प्रमाण आहे;
म्हणतात ऐकणारे हे संविधान आहे.
आम्ही कळ्याकळ्यांचे केलेत पाय भारी;
आता तुझे वसंता बसले दुकान आहे.
आता समुद्र सुद्धा लागेल थरथराया;
रस्त्यावरी उतरली माझी तहान आहे.
खोटे खरे कराया केकाटली वकीली;
आत्ताच भिंत होती! आत्ताच कान आहे!
पाण्यावरीच त्यांनी माझे सरण रचावे;
मेलो तरी मनाची बाकी तहान आहे.
मो. ९९२१२९७२९७
1 टिप्पणी:
पाण्यावरीच त्यांनी माझे सरण रचावे;
मेलो तरी मनाची बाकी तहान आहे.
Too Good.
टिप्पणी पोस्ट करा