८ ऑक्टोबर, २००८

आभार : वसंत केशव पाटील






त्यांना कसे कळाले मी ताज बांधल्याचे;
मी बोललोच नाही मुमताज वारल्याचे.

बोलाविशी कुणाला नाही कुणीच जागे;
जागेपणीच त्यांचे हे सोंग झोपल्याचे.

येथे न संपणा-या वाटेवरी उभा मी;
होतात भास मजला तू हात सोडल्याचे.

माझ्याच सावलीला ती सांगते कशाला;
पाठीवरी उन्हे मी बांधून चालल्याचे.

त्यांच्याच फायद्याचे मी बोलणार होतो;
जाहीर तोच झाले ‘आभार’ मानल्याचे.

मो. ९७६७७५१२३०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: