८ ऑक्टोबर, २००८

उन्मत्त श्वापदांनो : सुरेशकुमार वैराळकर



उन्मत्त श्वापदांनो नाचा खुशाल आता;
हा देश भामट्यांना केला बहाल आता.

बाजार सज्जनांचा रात्री उठून गेला;
निष्पाप पामरांना कोठे विकाल आता.

आला पुन्हा नव्याने हंगाम सांत्वनांचा;
संभावितांप्रमाणे शोधा रुमाल आता.

निर्व्याज त्या कळ्यांना आता कुणी न वाली;
दारी,घरी कुठेही दिसती दलाल आता.

दे आसरा,पुन्हा मी परतून आज आलो;
सारे जुने गुन्हे तू पोटात घाल आता.

मो. ९४२२००३५१२

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: